भारतीय क्रिकेट संघाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला फलंदाज करूण नायर सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. नॉर्दम्पटनशायर काऊंटी संघाकडून खेळत असलेल्या करूण याने आपल्या दुसऱ्या सामन्यात संघ अडचणीत असताना फलंदाजीला येत शानदार शतक झळकावले.
काही दिवसांपूर्वीच नॉर्दम्पटनशायर संघासाठी अखेरच्या तीन सामन्यांकरिता करारबद्ध झालेल्या नायर याने दुसऱ्याच सामन्यात आपली प्रतिभा दाखवून दिली. सरे संघाविरुद्ध खेळत असताना नॉर्दम्पटनशायर संघ 6 बाद 151 अशा संकटात सापडला होता. त्यावेळी करूण याने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करूण याने आक्रमण करत आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील 16 वे शतक पूर्ण केले. अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत 228 चेंडूंचा सामना करताना नाबाद 116 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 चौकारांचा समावेश आहे.
करुण नायर (Kaun Nair) याने भारतीय संघासाठी 2016 मध्ये पदार्पण केल होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला पहिल्यांदा संधी दिली गेली होती. त्यानंतर याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला पहिल्यांदा भारताच्या कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याची सरासरी 62.33, तर वनडे क्रिकेटमध्ये 23 राहील आहे. असे असले तरी, त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2017 मध्ये खेळला आहे. त्यानंतर अद्याप त्याला भारतीय संघात निवडले गेले नाहीये. देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी त्याने कर्नाटकची साथ सोडत आता विदर्भासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
(Karun Nair Hits Fine Century For Northamptonshire In County Championship)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर