fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यावर करुणानिधींनी चेस सेट भेट दिला होता- विश्वनाथन आनंद

डीएमके पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचे मंगळवारी, 7 आॅगस्टला वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते उत्कृष्ट राजकारणी होते, त्याचबरोबर ते खेळांचेही चाहते होते. तसेच ते नेहेमी खेळांना प्रोत्साहन देत.

त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने ट्विटरवर करुणानिधींची एक खास आठवण शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आनंदने ट्विट केले आहे, “आदरणीय करुणानिधींचे निधन झाले हे ऐकूण वाईट वाटले. ते महान तमिळ राजकारणी होते. मी माझ्या कारकिर्दीत अनेकदा त्यांना भेटलो आहे.

“जेव्हा मी पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन झालो होतो तेव्हा त्यांनी मला एक चेस सेट भेट देऊन माझा सन्मान केला होता. जो मी कायम जतन करुन ठवला आहे.”

तसेच आनंदने म्हटले आहे की, ते खेळाचे पुरस्कर्ते होते. त्यांची भाषणे प्रशंसनीय होती. माझी सहानुभुती त्यांच्या कुटुंबासमवेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीने विराट कोहलीचे असे कौतुक यापुर्वी कधीही केले नव्हते!

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!

सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी

You might also like