---Advertisement---

अशी कामगिरी करणारा काशिलिंग अडके होणार पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

---Advertisement---

चेन्नई | प्रो कबड्डीत आज दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध बेंगलुरु बुल्स संघात होत आहे. या सामन्यात काशिलिंग अडकेला एक खास पराक्रम करण्याची संधी आहे.

केवळ रेडिंगमध्ये ५०० गुण घेणारा ५वा खेळाडू होण्याची काशिलिंगला मोठी संधी आहे. त्याने आजपर्यंत ७२ सामन्यात ५२८ गुण घेतले आहेत. यातील ४९४ गुण त्याने केवळ रेडिंगमधून घेतले आहे.

यापुर्वी रेडिंगमधून राहुल चौधरी (६७५), परदिप नरवाल (६३६), अजय ठाकूर (५६३) आणि दिपक हुडा (५१४) यांनी रेडिंगमधून ५०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेतले आहेत.

या यादीत महाराष्ट्राचा रिशांक देवाडिगा ४५४ गुणांसह ७व्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment