यापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळलेला महाराष्ट्राचा स्टार कबड्डीपटू काशिलिंग आडकेला या कबड्डी मोसमात यु- मुंबा संघाने मोठी रक्कम देत खरेदी केले. सांगली जिल्ह्यातील आडकेला यु-मुंबाने तब्बल ४८ लाख रुपये मोजले.
हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या २४ वर्षीय काशिलिंग आडकेने यापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळताना ५२ सामन्यात ४०६ गुणांची कमाई केली आहे. त्यातील तब्बल ३८० गुण हे रेडच्या माध्यमातून तर २६ बचावाच्या माध्यमातून आले आहे.
Prolific raider Kashiling Adake is now a #Mumboy #VivoPKLAuction
— U Mumba (@umumba) May 22, 2017
सचिन तेंडुलकर आणि अनुप कुमार आदर्श असलेल्या काशीलिंगला यापूर्वी पहिल्या मोसमात १० लाख रुपयांची बोली लावून दबंग दिल्ली संघाने घेतले होते.
अन्य खेळाडूंमध्ये रिशांक देवाडिगाला उत्तर प्रदेशने ४५.५० लाख, सचिन शिंगाडेला पटना पाइरेट्सनेच ४२.५ लाख रुपये, विशाल मानेला पटना पाइरेट्सने ३६.५ लाख रुपये, निलेश शिंदेला दबंग दिल्लीने ३५.५ लाख, गिरीश इर्नाकला पुणेरी पलटणने ३३.५० लाख, नितीन मदनेला यु- मुंबाने २८.५० लाख , महेंद्र रजपूतला गुजरातने २५ लाख रुपयांची रक्कम दिली.
Another 2014 Asian Games gold medalist in our team! Welcome Nitin Madane, our newest #Mumboy #VivoPKLAuction pic.twitter.com/hXgUZ9lSwR
— U Mumba (@umumba) May 22, 2017
The defence just got stronger with Puneri lion Girish Ernak joining the Paltan. #VivoPKLAuction pic.twitter.com/pwY6g8VjHC
— Puneri Paltan (@PuneriPaltan) May 22, 2017