प्रो कबड्डीमध्ये काल यु मुंबा संघाने बेंगलुरु बुल्स संघाचा ३०-४२ असा पराभव केला. यु मुंबासाठी विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो महाराष्ट्राचा काशीलिंग आडके. या सामन्यात काशीलिंगने ५०० गुंणाचा टप्पा पार केला, अशी कामगिरी करणारा काशीलिंग केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. काशीलिंगने कालच्या सामन्यात रेडींगमध्ये सर्वाधीक १७ गुण मिळवले. त्यात त्याने १३ टच गुण मिळवले तर बाकीचे ४ गुण त्याने बोनसमध्ये मिळवले.
या मोसमात यु मुंबासाठी रेडींगमध्ये १०० पेक्षा जास्त रेडींग गुण मिळवणारा काशीलिंग पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्याच्या अगोदर काशीलिंगने १६ सामने खेळताना ९१ गुण मिळवले होते. त्यात ८४ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. काल बेंगलुरु बुल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने १७ गुण मिळवत १०० रेडींग गुंणाचा टप्पा पार केला. त्याचबरोबर तो सध्या यु मुंबा संघात या मोसमात सर्वाधिक १०८ गुण मिळवणारा खेळाडू बनला आहे.
या मोसमात १०० गुण मिळवण्याची कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंच्या यादीत काशीलिंगचा प्रवेश झाला आहे. या मोसमात सर्वाधीक गुण मिळवणारा खेळाडू प्रदीप नरवाल असून त्याच्या नावावर २३८ गुण आहेत. विशेष बाब म्हणजे त्याने सर्व गुण रेडींगमध्ये घेतले आहेत.
५०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे खेळाडू –
# राहुल चौधरी- ६१८ गुण
# अनुप कुमार -५१८ गुण
# काशीलिंग आडके- ५१४ गुण
# प्रदीप नरवाल ५०१ गुण