सध्या कश्मीरी ऍथलीट दानिश मंजूरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याला विश्वासच बसत नाहीय, की तो इंटरनॅशनल ताइक्वांदो इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दानिश नुकताच ऑलंपिक-रॅंकिंग ताइक्वांदो इव्हेंट होस्ट करणारे प्राचीन इजराइली शहर रमला इथे पोचला आहे. आपल्या स्वप्नातल्या स्पर्धेत पोचल्यावर दानिशने भारताचा स्वत:चा सोशल मीडिया मंच, ‘कू’ ऍपचे मनापासून आभार मानले आहेत, की याच्याच माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेला बळ मिळाले आणि बिगर-सरकारी संघटना ‘हेल्प फाउंडेशन’कडून त्याला स्पॉन्सरशिप प्राप्त झाली.
दानिशला दीर्घकाळापासून 58 किग्रॅ वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मनिषा होती. मात्र यादरम्यान आपला प्रवास आणि तिथं राहण्याचा खर्च पूर्ण करण्यासाठी पैशाची कमतरता असल्याने तो बराच निराश होता. खूप प्रयत्न केल्यावर त्याने अजून एक प्रयत्न केला. यासाठी त्याने देशाचा पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ऍपचा उपयोग केला. इथे दानिशने मल्टी-लिंग्वल ‘कू’ (एमएलके) चा वापर करत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मदत मागितली. त्याचा हा संदेश ‘कू’ ऍपवर सक्रीय असलेल्या जम्मू-कश्मीर इथल्या ‘हेल्प फाउंडेशन’पर्यंत पोचला. दानिशचे स्वप्न साकारले. ही एनजीओ आरोग्य, शिक्षण, खेळ, पुनर्वसन अशा क्षेत्रांमध्ये लोकांसाठी समर्पण देत काम करते.
ही स्पॉन्सरशिप मिळाल्यावर दानिश मंजूरने आभार व्यक्त करताना आपल्या कू हैंडलवर लिहिले, “मी कू ऍपचा खूप आभारी आहे, ज्याच्या माध्यमातून मला जम्मू-कश्मीरच्या @help_foundation कडून ऑलंपिक-रेंकिंग ताइक्वांदो इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मदद मिळाली. मी माझे प्रशिक्षक, @atul_pangotra यांचेही मार्गदर्शनासाठी आभार मानतो. मी नुकताच इजराइलला पोचलो. आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. कृपया मला असाच पाठिंबा देत रहा. जय हिन्द!”
कश्मीरच्या बारामूलाचा रहिवासी असलेल्या दानिशने कोविड-19 लॉकडाउनदरम्यानच घरून ताइक्वांदोचा अभ्यास करणे सुरू केले. वर्ष 2021 च्या ‘टोकी मेमोरियल ओपन ताइक्वांदो चॅम्पियनशिप’ मध्ये त्याने ‘सर्वश्रेष्ठ पुरुष ऍथलीट’चा खिताब मिळवत रजत पदक जिंकले.
आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाला केवळ संकटाच्या काळातच मदत मिळवण्यासाठी मोलाचे मानले जाते असे नाही, तर यातून लाभार्थी आणि आर्थिक मदतीची इच्छा असलेले असेही दोन प्रकारचे लोक एकमेकांशी जोडले जातात. सर्वांना एकत्र आणणाऱ्या बहुभाषी मंचाच्या रुपात ‘कू’ने सगळ्या भारतातल्या लाखो लोकांना त्यांचा आवाज मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. दानिशचे या मंचावर 1.22 लाखपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. दानिश सक्रियपणे खेळ आणि त्याच्याशी संबंधित विषयांबाबतच्या पोस्ट ‘कू’वर टाकत व्यक्त होत असतात.
दानिशच्या ‘कू’वर रिप्लाय करताना हेल्प फाउंडेशन एनजीओने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “भारताच्या एका नव्याने उद्याला येणाऱ्या ताऱ्याच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा जास्त चांगलं आम्ही काय करू शकतो? ऑल द बेस्ट, दानिश।”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल
खेळाडू सोडा आता तर थेट संघाच्या मॅनेजरमध्येच झाली हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘नाहीतर आम्ही क्रमवारीत वर कसं येणार?’ संतापलेल्या नॉर्कियाने थेट आयसीसीला विचारला सवाल