टी20 महिला विश्वचषकानंतर आयसीसीने महिला क्रिकेट टी20 क्रमवारी जाहिर केली आहे. यामध्ये फलंदाजीत भारतीय टी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह, जेमिमाह रॉड्रीगुएस, मिताली राज आणि स्म्रिती मानधना या चौघींचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात न्युझीलंड विरुद्ध 103 धावंची खेळी केल्याने कौरला 3 स्थानांचा फायदा झाला असून ती तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे.
तसेच या विश्वचषकात कौर सर्वाधिक धावा करण्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेलिनंतर दुसऱ्या क्रमांकवर होती. तिने 183 धावा केल्या होत्या.
कौरबरोबरच रॉड्रीगुएस, राज आणि मानधना या तिघीही अनुक्रमे सहाव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. तसेच टी20 विश्वचषकात सर्वाधिक 255 धावा करणारी आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावणारी हेली पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
टी20 संघाच्या क्रमावारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम असून भारत पाचव्या स्थानावर आहे. तर इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
फलंदाजीत जरी भारताचे चार खेळाडू पहिल्या दहामध्ये असले तरी गोलंदाजीत पहिल्या वीसमध्ये दोनच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
यामध्ये पुनम यादव दुसऱ्या तर अनुजा पाटील 20व्या क्रमांकावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची मेगन शट पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच अष्टपैलूच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियाचा फक्त तो एकटाच खेळाडू म्हणतो, विराट एक्सप्रेस थांबवणारच
–मला पहिल्या सामन्यात फलंदाजांनी धू-धू धूलते तेव्हा हार्दिक हसत होता- कृणाल पंड्या
–अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम