दक्षिण आफ्रिका T20 लीगसाठी सोमवारी (19 सप्टेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. केपटाऊन येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या लिलावात 318 खेळाडूंवर बोली लागणार होती. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात एमआय केपटाऊन, डर्बन सुपरजायंट्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स, पार्ल रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप हे सहा संघ खेळतील. विशेष म्हणजे या सर्व संघांना आयपीएल संघांच्या फ्रॅंचाईजीने विकत घेतले आहे.
सनरायझर्स इस्टर्न केप हा संघ सनरायझर्स हैदराबाद संघाने विकत घेतला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या लिलावावेळी संघाच्या सीईओ काव्या मारनही बोली लावण्यासाठी हजर आहेत. लिलावात उपस्थित असलेल्या काव्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायेत. ज्यावर चाहत्यांच्या हजारो प्रतिक्रिया येत आहेत.
Kavya Maran on the auction table for Sunrisers Eastern Cape. pic.twitter.com/2YUTN3CS8O
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2022
Seeing Kavya Maran cutie again in auction 🥰
— t-riser (@techsaturation) September 19, 2022
काव्या मारन ही प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी आहे. कलानिधी मारन हे सन ग्रुपचे संस्थापक आहेत. मागील अनेक वर्षांपासून काव्या सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ आहे. ती आयपीएल लिलाव तसेच आयपीएलच्या जवळपास प्रत्येक सामन्यासाठी हजर असते. ती ज्यावेळी स्टेडियममध्ये हजेरी लावते त्यावेळी ती नेहमी चर्चेत असते.
एसए टी20 लीग जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित केली जाईल. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू केली गेलेली आहे.
Is kavya ki rachna kisne ki hai 😍#Kavya #KavyaMaran#SAT20 #Auction
— harsh हर्ष (@mrHJ27) September 19, 2022
सनरायझर्स ईस्टर्न केपने लिलावा आधीच्या ड्राफ्टमध्ये ऐडन मार्करम व ओटेनिल बार्टमन यांना आपल्या संघात घेतले होते. लिलावात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा युवा यष्टीरक्षक ट्रिस्टन स्टब्स याला सर्वाधिक 9.2 मिलियन रॅंडची बोली लावून आपल्या ताफ्यात सामील केले. तसेच युवा अष्टपैलू मार्को जेन्सन याला देखील त्यांनी आपल्याच संघाचा भाग बनवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकारावर का भडकला रोहित? प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की काय घडलं?
जडेजाची रिप्लेसमेंट मिळाली! संघाला आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देणार सामना, कर्णधाराचे बडेबोल
का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर