मुंबई | चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू केदार जाधव दुखापतीमुळे अायपीएल २०१८मधून बाहेर पडला आहे. त्याला ही दुखापत वानखेडे स्टेडीअमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात झाली होती.
या सामन्यात शेवटच्या क्षणाला संघासाठी फलंदाजीला येत त्याने विजय मिळवून दिला होता. त्याने २२ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. तो या सामन्यात पहिल्यांदा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा १४ धावांवर असताना तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर पुन्हा फलंजीला आला तेव्हा चेन्नईच्या ९ विकेट तंबूत गेल्या होत्या.
संघाची गरज लक्षात घेऊन तो फलंदाजीला आला होता. त्यामुळे तो त्या दिवशी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांचा हिरो झाला होता.
त्याला या मोसमात तब्बल ७.८ कोटी रुपये देऊन चेन्नई सुपर किंग्जने संघात घेतले आहे. अशा एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूच्या बाहेर जाण्यामुळे चेन्नईला हा मोठा धक्का मानला जात आहे.