केदार जाधवच्या नेतृत्वाखालील सदर्न सुपर स्टार्स (SSS) ने बुधवारी लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2024 चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामना अतिशय रोमांचक होता, ज्यात सुपर ओव्हर खेळला गेला. सदन सुपर स्टार्सनं फायनलमध्ये इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील कोणार्क सूर्या ओडिशा (KSO) चा पराभव केला.
श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात सदर्न संघानं प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केएसओ संघ देखील 20 षटकांत 9 गडी गमावून 164 धावाच करू शकला. केएसओसाठी युसूफ पठाणनं दमदार खेळी खेळली. त्यानं 38 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 85 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोणार्क सूर्या ओडिशाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात दिलशान मुनवीरा (11) पॅव्हेलियनमध्ये परतला. यष्टिरक्षक रिचर्ड लेव्ही (16) आणि केविन ओब्रायन (17) मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या इरफाननं केवळ तीन धावा केल्या. जेसी रायडर (11) झेलबाद झाला. 12 व्या षटकापर्यंत केएसओच्या 78 धावांवर 5 विकेट पडल्या होत्या. मात्र, युसूफ पठाणनं एक टोक घट्ट पकडून आपला संघ शेवटपर्यंत सामन्यात टिकवून ठेवला.
सदर्न सुपर स्टारला शेवटच्या 2 षटकांत 35 धावांची आवश्यकता होती. युसूफनं 19व्या षटकात पवन नेगीला धारेवर धरलं. त्यानं या ओव्हरमध्ये चार षटकार आणि एक चौकार मारत 28 धावा केल्या. यानंतर चतुरंगा डी सिल्वाच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावा हव्या होत्या, पण केएसओ केवळ 6 धावाच करू शकला. युसूफ पठाण शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. अशा स्थितीत सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये केएसओनं 13 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सदर्नच्या मार्टिन गुप्टिलनं सुपर ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून केएसओच्या आशा धुळीस मिळवल्या.
हेही वाचा –
आता कसेही पैसे खर्च करा! आयपीएल रिटेन्शन नियमांमध्ये मोठे बदल
IND vs NZ; दुसऱ्या दिवशीही पाऊस घालणार खोळंबा? कसे असणार बेंगळुरूचे हवामान?
BAN vs SA; बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला शेवटचा सामना खेळण्याची संधी!