भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे भारतातच नव्हे तर जगभरात अनेक चाहते आहेत. त्याची भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणनाही होते. त्यामुळे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताता. असाच एक व्हिडिओ एप्रिल २०१९मध्ये व्हायरल झाला होता, ज्यात केदार जाधव आयपीएल दरम्यान धोनीने भरवताना दिसला होता.
हा व्हिडिओ स्वत: केदारने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमागील खास आठवण नुकतीच केदारने शेअर केली आहे. केदार आणि धोनी हे चांगले मित्र असून ते आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडूनही एकत्र खेळतात.
https://www.instagram.com/p/BwPmctXBcYk/
केदारने या खास व्हिडिओबद्दल बीसीसी मराठीसह केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितले की ‘एका सामन्यानंतर धोनी माझ्या शेजारी चहा प्यायला बसला तेव्हा त्यानी मला सहज विचारले की काय खातोय, तर मी त्यांना सांगितले की स्टार्टर आहे, त्यांनी विचारले की चांगले आहे का? मी म्हणालो हो चांगला आहे खाऊ शकता. तेव्हा मी त्यांना विचारलं की देऊ का आणि मी त्यांना भरवलं. आणि सुदैवाने मोहित शर्माने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
मोहितने नंतर मला सांगितले की तूझ्यासाठी माझ्याकडे खास गोष्ट आहे पण तू मला काय देणार त्यावेळी मी त्याला म्हणालो डिनर पार्टी देईल. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ मला दाखवला आणि मला खूप छान वाटलं, पण मी त्यात जास्त रस घेतला नाही. कारण मी असे अनेक क्षण त्याच्याबरोबर घालवतो. ते मी रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर टाकत नाही. मला त्या गोष्टी लोकांना दाखवायच्या नाहीत. माझा त्याच्याबरोबर जो बॉन्ड आहे त्यातून मला आनंद मिळतो.
‘पण मला मोहित म्हणाला, हे तू टाकलं पाहिजे, तूझ्या आणि माही भाईच्या चाहत्यांना हे आवडेत. तूमचा बॉन्ड, मैत्री कळायला पाहिजे, तूम्ही दोघेही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह रहाणारे नाही, पण चाहत्यांपर्यंत तूमचा बॉन्ड पोहचला पाहिजे.’