अॅंटीगा | विंडीजमधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर बुधवार, ४ जुलैला सुरु झालेल्या विंडीज-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगलादेशला पहिल्या डावात १८.४ षटकात ४३ धावांवर बाद केले.
यामध्ये विंडीजचा गोलंदाज किमोर रोचच्या माऱ्यापुढे बांगलादेशचा निम्मा संघ गारद झाला. रोचने ५ षटकात ८ धावा देत ५ बळी मिळवले.
याचबरोबर किमोर रोचने कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजीतील खास विक्रमाची बरोबरी साधाली. किमोर रोचने या सामन्यातील पहिल्या डावात फक्त पहिल्या 12 चेंडूत 8 धावा देत पाच बळी मिळवले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी म्हणजे 12 चेंडूत फक्त तीनच गोलंदाजांना बळी घेता आले आहेत.
हे करताच किमोर रोचने सर्वात कमी चेंडूत पाच विकेट घेणारे ऑस्ट्रेलियाचे मॉन्टी नोबेल आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस यांची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियाच्या मॉन्टी नोबेल यांनी 1902 साली इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत 5 बळी मिळवले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसने 2002 मध्ये बांगलादेश विरुद्ध 12 चेंडूत 5 बळी मिळवले होते.
सर्वात कमी चेंडूत पाच बळी घेणारे गोलंदाज-
12- मॉन्टी नोबेल वि. इंग्लंड 1902
12- जॅक कॅलिस वि. बांगलादेश 2002
12- किमोर रोच वि. बांगलादेश 2018
13- वकार यूनुस वि. बांगलादेश 2002
14- जेरमेन लॉसन वि. बांगलादेश 2002
यामध्ये विशेष असे आहे की या यादीतील मॉन्टी नोबेल वगळता बाकी सर्व गोलंदाजांनी सर्वात कमी चेंडूत पाच बळी बांगलादेश विरुद्ध मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादवसारखा गोलंदाज शोधून सापडणार नाही; महान खेळाडूने केले कौतुक
-मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट