वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. नुकताच वनडे विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित झाला. या संघातील काही नावांमुळे चांगलाच वाद पेटला. पण युझवेंद्र चहल याच्या नावावर यावेळीही विश्वचषकासाठी विचार केला गेला नाहीये. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने चहलकडे दुर्लक्ष केल्यानंतर फिरकीपटू गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारतीय संघाचा यशस्वी फिरकीपटू राहिला आहे. मात्र, मागच्या तीन-चार वर्षांमध्ये एकाही महत्वाच्या स्पर्धेत त्याला संधी दिली गेली नाहीये. यावर्षी मायदेशात होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याचे नाव संघात घेतले जाईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. विश्वचषक संघातून वगळल्यामुळे आथा चहलने इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी फिरकीपटू गोलंदाज केंट काउंटी संघासाठी खेळणार आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा चहल काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार चहलला बीसीसीआयकडून एनओसी देखील मिळाली आहे. चालू काउंटी हंगामात केंट संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. असात या तीन सामन्यांमध्ये चहलची भूमिका महत्वाची राहिली आहे.
युझवेंद्र चहल याने भारतासाठी वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 72 सामन्यांमद्ये 121 विकेट्स आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 27.13, तर इकॉनॉमी रेट 5.26 राहिला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चहलने आतापर्यंत 80 सामने खेळले असून यात 96 विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 25.09च्या सरासरीने विकेट्स घेतल्या असून 8.19च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
Super Four । बांगलादेशवर पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून विजय, वेगवान गोलंदाज ठरला सामनावीर
रोहित बनला वर्ल्डकप खेळणारा भारताचा 8वा कर्णधार, ‘ही’ आहेत इतर 7 नावे