क्रिकेटचा जागतिक विस्तार होत चालला आहे. अनेक देश टी20 प्रकारचे आंतरराष्ट्रीय सामने आणि लीग खेळत आहेत. युएईमध्ये आशिया चषक (Asia Cup)खेळला जात आहे, तर भारताच्या शेजारील देश नेपाळ हा केनियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी20 मालिका खेळली जात आहे. या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना पार पडला. हा सामना नैरोबीच्या जिमखाना क्लब ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी नोंदवली आहे. मात्र तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात केनियाने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकात 10 विकेट्स गमावत 101 धावासंख्या उभारली. त्यांच्या या वाईट स्थितीमागे संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) हा होता. त्याने 4 षटके टाकताना 9 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. लामिछानेच्या टी20 कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे.
केनियाकडून लुकास ओलुओच याने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर सलामीवीर कोलिन्स ओबुया याने 20 धावा आणि कर्णधार शेम नोगोचे याने 13 धावा केल्या. नेपाळकडून लामिछानेच्या व्यतिरिक्त आदिल अंसारीने दोन आणि शहाब आलम आणि दिपेंद्र सिंग यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
केनियाने दिलेल्या 102 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळ संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावत 94 धावांवरच गारद झाला. यावेळी रोहित पौडेल याने सर्वाधिक 47 धावा केल्या. मात्र त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकला नाही. तसेच तो वगळता एकाही खेळाडूने दुहेरी धावा केल्या नाहीत. हा सामना नेपाळने अवघ्या 7 धावांनी गमावला. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेतील केनियाचा हा दुसरा विजय ठरला आहे. तर नेपाळनेही 2 सामने जिंकल्याने मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे.
After producing an average performance till 3rd T20, Sandeep Lamichhane lived up to his reputation in the 4th T20 when he bagged 5⃣ wickets for 9 runs in his 4 overs! ????
Watch his brilliant wicket-taking deliveries from his spell ⬇️#KENvNEP #NepalVsKenya #T20Cricket #VUSport pic.twitter.com/dN2bmhXIl2
— VUSport Official (@VUSportOfficial) August 30, 2022
महत्वाच्या बातम्या-






