गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सेमीफायनल १ फर्स्ट लेग लढतीत केरला ब्लास्टर्सने नंबर वन तसेच शील्ड विजेत्या जमशेदपूर एफसीवर १-० असा विजय मिळवला. सहल समदचा एकमेव गोल निर्णायक ठरला.Photo Courtesy: Twitter/
पीजेएन स्टेडियम, फातोर्डा येथे खेळल्या गेलेला सामना हा केरला ब्लास्टर्सच्या नावे राहिला. त्याचे क्रेडिट सहल समद याला जाते. त्याने ३८व्या मिनिटाला अप्रतिम गोल करताना क्लबला आघाडीवर नेले. जमशेदपूरच्या टीपी रेहेनेशने समदला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, समद याचा अचूक फटका थेट गोलपोस्टमध्ये गेला. मध्यंतराला आघाडी घेण्यात केरला ब्लास्टर्सला यश आले तरी २०व्या मिनिटाला जमशेदपूरला गोल करण्याची संधी होती. मात्र, सिमिनलेन डाँगेलच्या अचूक पासवर डॅनियल चुक्वुने चेंडूवर ताबा मिळवला तरी त्याचा फटका गोलजाळ्यापासून दूर गेला. दहाव्या मिनिटालाही जमशेदपूरला गोल करण्याचा चान्स होता. मात्र, त्यावेळीही चुक्वु चुकला. त्याचा फायदा केरला ब्लास्टर्सला मिळाला.
सहल समदचा एकमेव गोल निर्णायक ठरला तरी पेनल्टी कॉर्नर (५-३) मिळवण्यासह चेंडूवर ताबा ठेवणे (५१-४९ टक्के), पासेस देण्यात (३०४-३०१) तसेच अचूक पास देण्यात (६१-५८ टक्के) जमशेदपूरने वर्चस्व राखले. ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकपदाखालील जमशेदपूरसाठी यंदाचा हंगाम आजवरचा सर्वात सर्वोत्कृष्ट हंगाम ठरला. त्यांनी २० सामन्यांत ४३ गुण मिळवताना प्रतिष्ठेच्या लीग शील्डवर पहिल्यांदा नाव कोरले.
त्यामुळे केरलाविरुद्ध जमशेदपूर विजयासाठी ‘हॉट फेवरिट’ होते. मात्र, केरलाने बाद फेरीतील पहिल्या सामन्यात खेळ उंचावताना त्यांची सलग सात विजयांची मालिका खंडीत केली. शुक्रवारच्या विजयासह त्यांनी साखळी फेरीतील परतीच्या लढतीतील पराभवांचा बदला घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज ‘रॉयल’ युद्ध!
केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग
क्या बात है! जमशेदपूर एफसीची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमासह प्रथमच जिंकली लीग शिल्ड!