ऑलिम्पिकमध्ये भारताला 41 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर हाॅकीमध्ये पदक मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले. भारतीय हाॅकी संघाच्या या कामगिरीत गोलरक्षक पीआर श्रीजेश याची महत्वाची भूमीका होती. केरळ सरकारने त्याच्या या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला 2 कोटी रुपयांच बक्षीस जाहीर केले आहे. त्याचसोबत लोक शिक्षण विभागातील उपनिर्देशक असलेल्या श्रीजेशला आता संयुक्त निर्देशक या पदावर बढती मिळाली आहे.
दुसरीकडे वीपीएस हेल्थकेयरचे डाॅ. शमशीर वयालिलने त्याच्यासाठी 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. ते म्हणाले, गोलरक्षक श्रीजेशने ऑलिम्पिकमध्ये भारतीय हाॅकी संघाला कांस्य पदक जिंकवून देण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडली. आम्ही त्याचे योगदान स्विकार करतो आणि रोख रकमेच्या पुरस्काराची घोषणा करताना प्रसन्न वाटत आहे.
कोची शहराजवळ गावात राहणारा पीआर श्रीजेश जेव्हा 30 किलोमीटर लांब प्राथमिक विद्यालयात होता तेव्हाच त्याच्या शारिरीक शिक्षण विषयाच्या शिक्षकांना त्याच्यातील गुण दिसायला लागले होते. श्रीजश सर्व गोष्टीत चांगला होता. तो थाळीफेक आणि भालाफेक खेळू शकत होता. तो वाॅलीबाॅल आणि बास्केटबाॅल या दोन्ही खेळांच्या संघात देखील होता. तो लांब उडी आणि उंच उडी मारू शकत होता.
श्रीजेशमध्ये अनेक कलागुण असल्यामुळे त्याला राज्याची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये सरकारी प्राथमिक खेळ विद्यालय जीवी राजा स्पोर्ट्स स्कुलमध्ये पाठवलं गेलं. तेथे तो त्याला जे खेळ कौशल्य हवं आहे ते घेऊ शकत होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनी विरोधात त्याने चांगले गोलरक्षण केले. त्याने या सामन्यात अनेक गोल रोखले. अंतिम 7 सेकंदात जेव्हा जर्मनीला एक पेनल्टी मिळाली, तेव्हा श्रीजेशने गोल जाण्यापासून रोखले आणि भारतासाठी इतिहास रचला.
महत्त्वाच्या बातम्या –
हंड्रेड लीगमध्ये फलंदाजाची २५३ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी, बनल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
लॉर्ड्स मैदानावरील भारतीय फलंदाजांच्या सर्वोत्तम खेळी, ‘दादा’च्या पदार्पणातील शतकाचाही आहे समावेश