संजू सॅमसनचे (Sanju Samson) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत त्याने वर्चस्व गाजवले. दरम्यान सॅमसनबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक सैयद मुस्ताक अली ट्रॉफीच्या (Syed mushtaq ali trophy 2024) आगामी हंगामासाठी केरळने सॅमसनला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. मेन इन ब्लू मालिका जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या 30 वर्षीय खेळाडूने मालिकेत 2 शतके झळकावली होती, ज्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला 3-1 ने पराभूत करून मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. संजू सॅमसनने (Sanju Samson) दुलीप ट्रॉफी 2024 द्वारे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, ज्यामध्ये त्याने भारत डी संघाचे प्रतिनिधित्व केले. आता तो सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये आपली छाप पाडताना दिसणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीसाठी केरळ संघ- संजू सॅमसन (कर्णधार), सचिन बेबी, रोहन कुनुमल, विष्णू विनोद, मोहम्मद अझरुद्दीन, जलज सक्सेना, बासिल थंपी, एस निझार, अब्दुल बासिथ, ए स्करिया, अजनास ईएम, सिजोमन जोसेफ, मिधुन एस, वैशाख चंद्रन, विनोद कुमार सीव्ही, बेसिल एनपी, शराफुद्दीन एनएम, आणि निधिश एमडी
केरळला सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये ई गटात स्थान देण्यात आले आहे. केरळ व्यतिरिक्त, या गटात सर्व्हिसेस, महाराष्ट्र, नागालँड, मुंबई, गोवा आणि आंध्र या संघांचा समावेश आहे. केरळ (23 नोव्हेंबर) रोजी सर्व्हिसेसविरूद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल आणि 3 डिसेंबर रोजी हैदराबादच्या जिमखाना मैदानावर यजमान आंध्र विरूद्ध त्यांच्या गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूला घाबरतोय ऑस्ट्रेलिया संघ
IND vs AUS; भारताने ऑस्ट्रेलियात कधी खेळला होता शेवटचा सामना? काय होता निकाल?
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या इतिहासातील भारताचे मोठे रेकाॅर्ड…!