मुंबई। ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मैदानावर खूपच आक्रमक असतात. कोणत्याही मुद्द्यांवर ते परखडपणे मते मांडतात. मैदानात विरोधी संघातल्या खेळाडूंवर स्लेजिंग करतात. त्यामुळे अनेकदा वाद उफाळून येतो. निवृत्तीनंतरही हे खेळाडू आपल्या वर्तनात सुधार करताना दिसत नाहीत किंवा सतत आक्रमकपणे टीका करताना दिसून येतात.
2018 सालीही असाच प्रकार घडून आला. भारताचा सलमावीर फलंदाज मयंक अगरवालवर ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू आणि समालोचक कॅरी ओ कीफे यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती.
मयंक अगरवालने 2018 ला मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्यात 76 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. या खेळीसह 71 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला होता.
पण तो ही खेळ करत असताना ऑस्ट्रेलियाचे समालोचक कॅरी ओ कीफे यांनी त्यांच्यावर टीका केली त्यानंतर वाद निर्माण झाला होता.
मयंक विक्रमांच्या अगदी जवळ पोचताच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले कॅरी ओ कीफे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी मयंकच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच अगवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली त्रिशतकी खेळी कॅटींनमधील कर्मचाऱ्यांच्या किंवा हाॅटेमध्ये काम करणाऱ्या वेटरसोबत केली असल्याचे त्यांनी भाष्य केले होते.
2017 साली रणजी सामन्यात हैदराबादविरुद्ध खेळताना मयंकने 304 धावांची त्रिशतकी खेळी केली होती. या खेळीवर कीफे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
या वादग्रस्त विधानानंतर कीफे यांच्यावर ऑस्ट्रेलिया मीडियाने देखील टीका केली. त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.
या टीकेनंतरही अगरवालने मात्र या सामन्यात पहिल्या डावात 76 आणि दुसऱ्या डावात 42 धावांची खेळी करत त्याच्यातील प्रतिभेची चूणूक दाखवली होती.
या सामन्यात जेव्हा अगरवालने 76 धावांची खेळी केली त्यानंतर फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करत असलेले कॅरी कीफे यांनी माफी मागतली. त्यांनी म्हटले होते की ‘मी अगरवालच्या भारतात केलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या धावांबद्दल बोलत होतो. ज्यावर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.’
‘मी कोणत्याही प्रकारे त्याच्या स्थराला कमी मानत नाही. त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. त्यामुळे कोणालाही वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.’
मयंक अगरवालने कसोटीमध्ये पदार्पण केल्यानंतर परत पाठीमागे वळून पाहिले नाही. त्याने भारताकडून खेळताना 11 कसोटी सामन्यात 57.29 च्या सरासरीने 974 धावा केल्या आहेत. यात तीन 4 बहारदार शतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
अमिताभ बच्चन लवकर बरे व्हा, पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने केली प्रार्थना
भारताचा हा दिग्गज क्रिकेटपटूही आढळला कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनामुळे ‘या’ देशातील क्रिकेटपटूंवर आली उपासमारीची वेळ