पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात केवल किरपेकर, सिद्धार्थ मराठे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील आठव्या मानांकित केवल किरपेकरने अव्वल मानांकित कुशल चौधरीचा 6-4, 4-6, 6-1असा संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. बिगरमानांकित सिद्धार्थ मराठे याने पाचव्या मानांकित जैष्णव शिंदेचा 6-2, 6-2असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
वीर प्रसादने आर्यन हूडवर टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-2असा विजय मिळवला. मुलींच्या गटात अव्वल मानांकित इरा शहाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत आठव्या मांनाकीत माही शिंदेचा 6-1, 6-1असा एकतर्फी पराभव केला. तिसऱ्या मानांकित सोहा पाटीलने पाचव्या मानांकित सानिया मोरेचा 6-3, 6-3असा तर, चौथ्या मानांकित रुमा गाईकैवारीने आशी छाजेडचा 6-4, 6-1असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
12वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित स्वरा काटकरने उर्वी काटेचे आव्हान 6-3, 6-1असे मोडीत काढले. सानिका भोगाडे हिने चिन्मयी बागवेला 7-5, 6-2असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
14वर्षाखालील मुली:
उपांत्यपूर्व फेरी:
इरा शहा(1)वि.वि.माही शिंदे(8) 6-1, 6-1;
सोहा पाटील(3)वि.वि.सानिया मोरे(5) 6-3, 6-3;
रुमा गाईकैवारी(4)वि.वि.आशी छाजेड 6-4, 6-1;
मान्या दारंगे वि.वि.आदिती लाखे 6-0, 6-0;
14वर्षाखालील मुले:
केवल किरपेकर(8)वि.वि.कुशल चौधरी(1) 6-4, 4-6, 6-1;
सिद्धार्थ मराठे वि.वि.जैष्णव शिंदे(5) 6-2, 6-2;
अझमीर शेख(6)वि.वि.अर्णव पापरकर 6-3, 6-3;
वीर प्रसाद वि.वि.आर्यन हूड 7-6(4), 6-2;
12वर्षाखालील मुली:
स्वरा काटकर(1) वि.वि.उर्वी काटे 6-3, 6-1;
सानिका भोगाडे वि.वि.चिन्मयी बागवे 7-5, 6-2;
आस्मि आडकर(3)वि.वि.प्राप्ती पाटील(6) 6-2, 6-2;
आदिती लाखे(5)वि.वि.आनंदी भुतडा 6-0, 6-1;
12वर्षाखालील मुले:
ऋषिकेश अय्यर(1)वि.वि.आर्यन सुतार 7-5, 6-1;
केवल किरपेकर(3)वि.वि.आदित्य तलाठी(6) 7-5, 6-1;
अर्णव पापरकर(2)वि.वि.राघव अमीन 6-1, 6-1;
वेदांत भसीन वि.वि.अभिराम निलाखे 6-7(2), 6-3, 6-4