आयर्लंड क्रिकेट संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा केविन ओब्रायनने मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने शेवटचे ऑक्टोबरमध्ये शारजाह येथे नामिबिया विरुद्ध २०२१ टी-२० विश्वचषक पहिल्या फेरीच्या सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. ओब्रायनने आत्तापर्यंतच्या प्रत्येक तीन कसोटी सामन्यांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या तो या फॉरमॅटमध्ये देशाकडून एकमेव शतकवीर आहे, त्याने २०१८मध्ये डब्लिनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पणात दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या होत्या. शिवाय आंतरराष्ट्रीय खेळातील त्याची सर्वोत्तम खेळी २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध बेंगळुरू येथे झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात आली होती. जेव्हा त्याने ३२८ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. शिवाय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटची वाटचाल सुरू आहे’, कपिल देवने केली थेट आयसीसीला विनंती
‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लवकरच बनणार डॅडी, पत्नीचे बेबी बंपसोबतचे फोटो केलेत शेअर