इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनचे प्राणी प्रेम नेहमीच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिसून आले आहे.तसेच तो वन्यप्राणी संवर्धनासाठीही पुढाकार घेत आहे. त्याचे या क्षेत्रातले कामही उल्लेखनीय आहे.
अशाच वन्यप्राण्यांच्या सामाजिक प्रश्नासाठी आता त्याने भारतातही पुढाकार घेतला आहे. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी रायपूर, छत्तीसगढ येथून बिबटयाच्या बछड्या(बिबट्याच्या पिल्लाला)ला दत्तक घेतले आहे. याबद्दल त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या बछड्याबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहे.
त्याने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की, “हाच आनंद आहे. बिबट्याचा हा बछडा किती सुंदर आहे.”
https://www.instagram.com/p/BfpvBqtjvLc/?taken-by=kp24
https://twitter.com/KP24/status/967724021595983872
https://www.instagram.com/p/BfnjsreDjzl/?taken-by=kp24
https://twitter.com/KP24/status/967775059090665480
त्याने मागील आठवड्यात या बछड्याला दत्तक घेतले असल्याचे याआधीच सांगितले होते. आठवड्याभरापूर्वी पीटरसनने या बछड्याचा व्हिडीओ शेयर करताना म्हटले होते, “मी या अनाथ बछड्याला भारतातील रायपूरमधून दत्तक घेतले आहे. मला काही आठवड्यांपूर्वी ही संधी मिळाली. तेव्हा मी पहिले होते की जानेवारी महिन्यात भारतातील ४० बिबट्यांना मारण्यात आले होते. त्यातील एक तृतीयांश बिबट्यांची शिकाऱ्यांकडून शिकार करण्यात आली आहे. त्यामुळे मी यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. मी पुढील महिन्यात या बछड्याला भेटण्यासाठी भारतात येत आहे.”
https://www.instagram.com/p/BfXiZRFD7bg/?taken-by=kp24
पीटरसन करत असलेल्या या सामाजिक कार्याबद्दल अनेक वन्यप्राणी संरक्षणवाद्यांनी कौतुक केले आहे. पीटरसनची असे करण्याची पहिलीच वेळ नसून त्याने गेंड्यांच्या शिंगांसाठी होणारी शिकार यासाठीही आफ्रिकेत चांगले काम केले आहे. त्यासाठी तो SORAI (Save Our Rhinos Africa/India) मध्येही सहभागी आहे, या बद्दल तो सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत असतो. तसेच त्याने जेव्हा चीनमध्ये हस्तिदंत व्यापार बेकायदेशीर असल्याचे घोषित झाल्यावर आनंद व्यक्त केला होता.
पीटरसन करत असलेल्या या सामाजिक कार्याने त्याने सर्व खेळाडूंपुढे आदर्श ठेवला आहे. त्याने सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेनंतर तो सर्वच क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे घोषित केले आहे.