केविन पीटरसन या इंग्लंडच्या स्टार खेळाडूची इंग्लडकडून क्रिकेट खेळायची संधी आता जराशीही उरली नाही आणि त्याला या गोष्टीचे आजिबात वाईट वाटत नाही, या उलट तो म्हणतो की तो इंग्लंडच्या संघाच्या बाहेर गेलो म्हणून त्याच लग्न टिकलं.
“घरात चार भिंतींमध्ये राहून जो मानसिक दबाव येतो तो सहन करणे खूपच अवघड असते आणि दिवसेंदिवस तो दबाव वाढतच जातो. २०१४ मध्ये इंग्लंड संघामधून माझी हकालपट्टी करून इंग्लंड व्यवस्थापनाने माझ्यवार एक उपकारच केले आहेत. त्यामुळेच माझं माझ्या मुलाबरोबरच नातं घट्ट झालं आणि माझं लग्नही सुरक्षित राहील.” असे पीटरसन म्हणाला.
पीटरसन आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत होता ते म्हणजे तो आता दक्षिण आफ्रिकेत राहत आहे म्हणजे तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार का? तर जर पीटरसनला दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे असेल तर त्याला आयसीसीच्या नियमानुसार २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.