भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाज माध्यमांवर कमालीचे सक्रिय असतात. ते सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात. त्यांनी भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनी जगभरातील अनेक सेलिब्रिटींना पत्र लिहिले होते. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यांचाही समावेश होता. त्यापैकी एक असलेल्या इंग्लंडच्या केविन पीटरसन याने ट्विट करत पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांना भेटण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे.
मोदी यांनी लिहिले होते पत्र
नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी रोजी जगभरातील अशा प्रसिद्ध व्यक्तींना पत्राद्वारे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यांचा भारताशी निकटचा संबंध आला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल व इंग्लंडच्या केविन पीटरसन यांचा समावेश होता. पीटरसन याने आपल्या या सन्मानाबाबत मोदी यांचे ट्विट करत आभार मानले. पीटरसनने लिहिले,
‘श्रीमान, नरेंद्र मोदी, मला खास पत्र पाठवून सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद. २००३ मध्ये भारतात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक भेटीत मला तुमच्या देशाबद्दल अधिक प्रेम वाटत आहे. मला अलीकडेच विचारण्यात आले, ‘तुम्हाला भारताबद्दल सर्वात जास्त काय आवडते? माझे उत्तर होते तेथील लोक.
https://twitter.com/KP24/status/1486902394059378691?s=20&t=5qWIyGCiJ_FquggwxMIFyg
काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. भारत ज्ञजागतिक स्तरावरील एक शक्तिशाली व अभिमानास्पद देश आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यात भारत हा जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. याबाबत बोलण्यासाठी मी आपणास प्रत्यक्ष भेटण्यास उत्सुक आहे.’
गेल व रोड्स यांनाही पाठवलेले पत्र
पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी ख्रिस गेल व जॉन्टी रोड्स यांनाही पत्र लिहीत, त्यांना भारताबद्दल असलेल्या आत्मयितेबद्दल धन्यवाद दिले होते. त्यानंतर या दोघांनीही मोदी यांचे समाज माध्यमांवरून आभार व्यक्त केलेले.
महत्वाच्या बातम्या-