---Advertisement---

यंदा टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता केवळ ‘या’ दोन संघात, केविन पीटरसनचा दावा

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 12:30 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये इंग्लंड संघाची विजयाची घोडदौड कायम आहे. इंग्लंडने विश्वचषकात त्यांचे पहिले चारही सामने सलग जिंकले आहेत. या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातीत त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार केवन पीटरसन असे म्हणणे आहे की, इंग्लंड संघाला अंतिम सामना न खेळता जेतेपदाजी ट्रॉफी दिली गेली पाहिजे.

पीटरसनने ट्वीट करून त्याचे मत मांडले आहे. तसेच त्याने त्या दोन संघांची नावेही सांगितली आहेत, जे विश्वचषकात इंग्लंडला पराभूत करू शकतात.

इंग्लंड टी२० विश्वचषकात ग्रुप एकचा भाग आहे. संघाने त्याच्या पहिच्या चार सामन्यात वेस्ट इंडीज, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांना पराभवाचे पाणी पाजले आहे. यानंतर ६ नोव्हेंबरला इंग्लंड संघ त्यांचा विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. संघाने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास पक्के केले असून सुपर १२ फेरीच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड दक्षिण अफ्रिकेचा पराभव करतो की, पराभूत होतो, हे पाहणे बाकी आहे.

केविन पीटरसनने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हे ट्वीट केले आहे. पीटरसनने ट्वीटमध्ये लिहिले की, “फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या टी२० विश्वचषकात इंग्लंडला पराभूत करू शकतात. पण आणि हा खूप मोठा पण आहे, हा सामना शारजाहच्या वापरल्या गेलेल्या खेळपट्टीवर खेळला जावा आणि जर सामना दुसरीकडे कुठे झाला, तर इंग्लंडला ट्रॉफी दिली गेली पाहिजे, ज्याप्रकारे ईपीएलमध्ये सध्या चेल्सीला ट्रॉफी दिली गेली पाहिजे.”

https://twitter.com/KP24/status/1455433406356070401

इंग्लंडने विश्वचषकाच्या ग्रुप एकमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. तर दुसरीकडे ग्रुप दोनमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन संघानीही जबरदस्त प्रदर्शन केले आहे. अफगाणिस्तान त्याच्या तीन सामन्यापैकी फक्त एकात पाकिस्तानकडून पराभूत झाला आहे, तर पाकिस्तानने त्याच्या पहिल्या चार सामन्यात भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि नामिबिया या संघाला नमवले आहे. यानंतर आता इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार बनले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीनंतर भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ ५ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

‘तुम्ही पहिल्या तीन फलंदाजांच्या क्रमांकामध्ये बदल करु शकत नाही’, दिग्गजाने सांगितली भारतीय संघव्यवस्थापनाची चूक

“जसा भारतासाठी एमएस धोनी, तसाच इंग्लंडसाठी ओएन मॉर्गन”, भारतीय क्रिकेटरकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---