पुणे ।महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अपराजित्व राखताना बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने २१ वषार्खालील गटात केरळचा ट संघाने केरळचा व २१ वषार्खालील मुलींनी आंध्रप्रदेशचा पराभव केला.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा १४-२ असा एक डाव १२ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून प्रियंका भोपी ( ४ मिनिटे १० सेकंद), अपेक्षा सुतार (२ मिनिटे ५० सेकंद), निकिता पवार (१ मिनिट ५० सेकंद) यांनी उल्लेखनीय खेळ केला. ऋतुजा खरे (३ गडी), मयुरी मुत्याल, प्रणाली बेनके (प्रत्येकी २ गडी) यांनीही महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. आंध्रप्रदेश संघाने मध्यंतरालाच पराभव मान्य करीत सामना सोडला. आंध्रप्रदेशच्या पी. लक्ष्मी व टी. झांसी यांनी चांगली लढत दिली.
महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलांच्या संघाने केरळचा १७-१३ असा पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या अवधूत पाटील(२मि ४० सेकंद व दीड मिनिट, एक गडी), संकेत कदम (२ मिनिटे, दीड मिनिटे व ४ गडी), अरुण गुणके (एक मिनिट, दीड मिनिटे, ३ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. केरळच्या अजिथ मोहन, एम. प्रवीण व ए अभिराम यांनी जोरदार लढत दिली.
महाराष्ट्राने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आंध्र प्रदेशचा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. त्या वेळी महाराष्ट्राकडून विजय शिंदे, दिलीप खांडवी, चंदू चावरे यांचा खेळ उल्लेखनीय झाला. आंध्रकडून राम मोहन, अशोक कुमार, व्यंकटेश यांनी चमक दाखविली. १७ वषार्खालील मुलींमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १२-८ असा पराभव केला. त्याचे श्रेय किरण शिंदे, अश्विानी मोरे, दिक्षा सोनसूरकर, श्रुती शिंदे यांच्या अष्टपैलू खेळास द्याावे लागेल. गुजरातकडून निकिता सोळंकी, अर्पिता गमीत यांनी चांगली लढत दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी