पुणे। महाराष्ट्राने मुष्टीयुद्धात हरयाणा व मणीपूर यांचे आव्हानास यशस्वीरित्या सामोरे जात १७ वर्षालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. ज्येष्ठ आॅलिंपिकपटू मनोज ंपगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी देविका हिच्या लढतीबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. तिने ४६ किलो गटात हरयाणाच्या तमन्ना हिच्यावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. तिने सुरुवातीपासूनच या लढतीवर नियंत्रण राखले होते.
देविका हिने यापूर्वी कनिष्ठ गटाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली होती. सुवर्णपदकाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना तसेच पिंगळे यांना देत ती म्हणाली, या लढतीत विजय मिळविण्याचा माझा निश्चय होता. लढतीमधील कोणतेही दडपण मी घेतले नव्हते. २०२४ च्या आॅलिंपिकमध्ये पदक मिळविण्याचेच माझे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मी खूप मेहनत करणार आहे. माऊंट कार्मेल प्रशालेकडून मला नेहमीच साहाय्य मिळत असते.
मितिका हिने ६६ किलो गटात हरयाणाच्या मुस्कान हिला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. लढतीमधील पहिल्या फेरीपासूनच तिने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळेच तीनही फेºयांमध्ये तिचे वर्चस्व राहिले. मितिका ही कांदिवली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात प्रतिभा जाखड व मनप्रित कौर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिचे वडील संजय व आई कांचन यांच्याकडून तिला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे.
मितिका म्हणाली, मुष्टीयुद्धात २०२४ च्या र्आँलपिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे. हे ध्येय साकार करण्यापूर्वी मला युवा आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करावयाची आहे. त्यासाठी स्पर्धात्मक सरावावर मी भर देणार आहे. . यंदा बारावीची महत्त्वाची परिक्षा असली तरी मी मुष्टीयुद्धाच्या सरावावर लक्ष देत आहे. अर्थात त्यासाठी पालकांचाही मला पाठिंबा आहे.
मुलांच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोम याने मिझोरामच्या जोरामुओना याच्यावर ४-१ अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. त्याने या लढतीत नियोजनबद्ध कौशल्य दाखविले. चोंगथोम हा आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युटमध्ये सराव करतो. त्याचाच सहकारी शेखोमसिंग याने ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिंसांगा याचा दणदणीत पराभव केला. मितेई या महाराष्ट्राच्या खेळाडूने हरयाणाच्या यशवर्धनसिंग याला पराभूत केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक ठोसेबाजी करीत ही लढत जिंकली. ही लढत जिंकल्यानंतर तो म्हणाला, ही लढर्त ंजकण्याची मला खात्री होती. आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युटमधील नियमित सरावामुळेच मला हे यश मिळविता आले.
पुण्यातील नेहरू स्टेडियमवरील एमआयजीस अकादमीत शिकणाºया आकाश गोरखा याच्या लढतीबाबत उत्सुकता होती. त्याने ५७ किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या वंशिजकुमार याला शेवटपर्यंत चिवट लढत दिली. ही लढत तो जिंकणार असे वाटले होते. तथापि पंचांनी वंशिजकुमारच्या बाजूने निकाल दिला. मात्र प्रेक्षकांनी आकाश याने दाखविलेल्या कौशल्याचेच कौतुक केले. आकाश म्हणाला, मी ही लढत जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र सुवर्णपदक हुकल्यामुळे थोडेसे दु:ख वाटले. अर्थात मला अजून भरपूर करिअर करावयाचे आहे. आॅलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. महाराष्ट्राच्या लैश्रामसिंग यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ६० किलो गटात त्याला हरयाणाच्या अंकित नरवाल याने पराभूत केले.