पुणे। सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात कास्यंपदक मिळवून दिले. कास्यंपदकाच्या प्ले ऑफ लढतीत त्याने राजस्थानच्या जगदीश चौधरी याचा ६-२ असा सहज पराभव केला.
पुण्यात खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या तीन तिरंदाजांनी सुवर्णपदकाची संधी आहे. यामध्ये कम्पाउंड प्रकारात १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रथमेश जावकर, मुलींच्या गटात ईशा पवार, तर २१ वर्षांखालील गटात रिकर्व्ह प्रकारात साक्षी शितोळे यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान, कंम्पाउंडच्या प्रकारातील २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष याला हरियानाच्या सुमीत कुमारकडून १४२-१४० असा दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात रिकर्व्हच्या कास्यंपदकाच्या प्ले आॅफ लढतीत बिशाल चांगमणी हिला राजस्थानच्या कर्णी सिंग हिचे आव्हान पेलवले नाही. कर्णीने निर्विवाद वर्चस्व राखताना बिशाल हिचा ६-० असा पराभव केला.