Loading...

खेलो इंडिया म्हणजे जागतिक स्पर्धेस आल्याचाच भास – सुशीलकुमार

पुणे । उदयोन्मुख खेळाडूंचा अवर्णनीय उत्साह, स्पर्धेसाठी करण्यात आलेली तयारी पाहता खेलो इंडिया महोत्सव म्हणजे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेस उपस्थित राहिल्याचाच मला भास होत आहे, असे आॅलिंपिक रौप्य व ब्राँझपदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने सांगितले.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडियामधील वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विजेत्यांना सुशीलकुमार याच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, खरंच मी येथे आल्यानंतर खूप भारावून गेलो आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथील उत्साहवर्धक वातावरण पाहता हा उद्देश निश्चित सफल होणार आहे.

तो पुढे म्हणाला, केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी मनापासून आभार मानतो. येथे आल्यानंतर नवोदित खेळाडूंशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो. आमच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंपासून त्यांनी स्फूर्ति घेऊन देशाचा नावलौकिक उंचावला पाहिजे. खेलो इंडिया स्पर्धेत चमक दाखविणाºया खेळाडूंमधून भावी आॅलिंपिकपटू निर्माण होतील अशी मला खात्री आहे.

आॅलिंपिक पदक मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने खूप मेहनत केली पाहिजे. आॅलिंपिक पदक मिळविण्यासाठी खूप कष्ट व त्याग करावा लागतो. माझ्या यशाचे श्रेय माझे गुरु सतपालसिंग यांना द्याावे लागेल. त्यांच्यामुळेच मी आॅलिंपिक पदकापर्यंत पोहोचलो आहे.

टोकियो येथील २०२० च्या आॅलिंपिक क्रीडा स्पधेर्बाबत विचारले असता सुशीलकुमार म्हणाला, आॅलिंपिक पदकाची हॅटट्रिक करण्याचे माझे ध्येय आहे. टोकियो येथे सुवर्णपदक मिळविण्याचेच माझे ध्येय आहे. त्यादृष्टीने मी भरपूर सराव करीत आहे. मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार आहेत. तेथूनच माझी आॅलिंपिकची खºया अथार्ने तयारी सुरू होणार आहे.

शंभर टक्के तंदुरुस्त तंदुरुस्तीबाबत सुशीलकुमार म्हणाला, मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे. टोकियो येथे होणा-या आॅलिंपिकपर्यंत ही तंदुरुस्ती टिकविण्याबाबत मी योग्य ती काळजी घेत आहे. त्यादृष्टीने पोषक आहार व पूरक व्यायाम याबाबत मी वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहे.

You might also like
Loading...