पुणे। खो खो मधील २१ वषार्खालील मुले व मुलींमध्ये महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. मुलांच्या अंतिम सामन्यात त्यांनी केरळचा १५-१३ असा तीन मिनिटे ५० सेकंद बाकी राखून पराभव केला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. त्यावेळी पूर्वार्धात महाराष्ट्रकडे १०-६ अशी आघाडी होती. महाराष्ट्राकडून अवधूत पाटील (२ मि. १० सेकंद व १ मि. ५० सेकंद व दोन गडी), संकेत कदम (२ मि. १० सेकंद व एक गडी), ह्रषिकेश मुरचावडे (१ मि. ५० सेकंद व १ गडी), अरुण गुणके (२ मि. व तीन गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. केरळ संघाच्या विसाग (१ मि. व ४ गडी), सॅमजित (१ मि. ३० सेकंद व १ मि. ५० सेकंद), अजित मोहन (दीड मिनिटे व २ गडी) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ७-६ असा एक डाव एक गुणाने पराभव केला. त्याचे श्रेय प्रियांका भोपी (नाबाद ४ मि. ४० सेकंद व तीन मिनिटे), अपेक्षा सुतार (२ मि. २० सेकंद व १ मि. २० सेकंद तसेच एक गडी), निकिता पवार (२ मि. व १ मि. ५० सेकंद), काजल भोर (नाबाद १ मि. व तीन गडी), कविता घाणेकर (२ गडी) यांना द्याावे लागेल. केरळ संघाकडून एस. अर्चना व के.कलाईवाणी यांनी प्रत्येकी एक मिनिट ५० सेकंद पळतीचा खेळ केला. ऐश्वार्या व रोशना विल्सन यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.