पुणे । कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश पाहावयास मिळाले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर मात करीत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. मात्र १७ वषार्खालील मुलींमध्ये सलग दुसरा पराभव झाल्यामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशला ३१-१९ असे पराभूत केले. पूर्वार्धात त्यांनी १२-९ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जोरदार चढाया व अचूक पकडी करीत सहज विजय मिळविला. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी हिने अष्टपैलू खेळ करीत महत्त्वाचा वाटा उचलला.
महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुलींमध्ये हरयाणाने ३७-१७ असे पराभूत केले. त्या वेळी पूर्वार्धात हरयाणाने १८-११ अशी आघाडी घेतेली होती. सुरुवातीपासून हरयाणाच्या खेळाडूंनी या सामन्यावर पकड ठेवली होती.
त्यांच्या दडपणाखाली महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांची निराशा झाली. हरयाणाने हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने वाटचाल राखली.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी