13 जानेवारीपासून राजधानी नवी दिल्ली येथे खो-खो विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकूण 23 संघ सहभागी होतील. भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूटानसह ग्रुप ए मध्ये आहे. तर भारतीय महिला संघाला ग्रुप ए मध्ये इराण, मलेशिया आणि कोरिया सोबत ठेवण्यात आलंय.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियानं खो-खो वर्ल्ड कप 2025 साठी 15 सदस्यीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली. 2016 मध्ये भारतासाठी पदार्पण करणारा प्रतीक वायकर भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व करेल. तर महिला संघाची कर्णधार महाराष्ट्राची प्रियंका इंगळे आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जानेवारीला खेळला जाईल.
खो-खो विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघ – सुयश गर्गाटे, प्रतिक वायकर (कर्णधार), रामजी कश्यप, शिवा पोटिर रेड्डी, प्रभानी साबर, मेहुल, सचिन भार्गो, आदित्य गणपुले, गौतम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि वी, सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस रोक्सन सिंह; राखीव – विष्णुनाथ जनकीराम, अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील
खो-खो विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ – प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, सुभाश्री सिंह, मगई माझी, भीलर देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नाजिया बीबी, नसिरीन शेख, मीनू, मोनिका; राखीव – संपदा मोरे, प्रियंका भोपी, ऋतिका सिलोरिया
भारतात खो-खो विश्वचषकाचं लाईव्ह प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टारवर होईल. याशिवाय हे सामने स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील. 13 जानेवारीला भारतीय पुरुष संघाचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल.
हेही वाचा –
“मी कपिल देवला मारायला निघालो होतो”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, डेव्हिड वॉर्नरच्या जागी या खेळाडूची निवड
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी माजी क्रिकेटपटूने निवडला भारतीय संघ, ‘या’ स्टार खेळाडूलाच वगळले