---Advertisement---

नागालँडचा एकलव्य..! माजी दिग्गजाचे व्हिडीओ पाहून शिकला गोलंदाजी, आयपीएलचे ‘हे’ संघ बनवणार कोट्याधीश

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 8:18 AM
---Advertisement---

येत्या १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडणाऱ्या आयपीएल लिलावाची चर्चा आता अधिकच जोर धरू लागली आहे. जसजसे दिवस जवळ येत आहेत, तसतसे क्रिकेटप्रेमींचा उत्साह अधिकच वाढत असताना दिसू लागलाय. आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या २९२ खेळाडूंपैकी एका खेळाडूकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. तो खेळाडू म्हणजे, नागालँडचा १६ वर्षीय युवा फिरकीपटू ‘ख्रिविस्तो केन्से.’

नागालँडच्या या फिरकीपटूची चर्चा सर्वत्र होत असून आयपीएल खेळाडूंच्या लिलावात देखील सर्व संघाचे लक्ष त्याच्यावर असेल. दिमापूर नजीक सोविमा गावातील एका सुतारा कुटुंबीयांच्या सात मुलांपैकी पाचवा असलेल्या केन्सेचे म्हणणं आहे की, तो आपोआपच क्रिकेटपटू बनला आणि टिव्हीवर शेन वॉर्नची गोलंदाजी पाहून त्याने आपले कौशल्य सुधारले.

पीटीआयसोबत एक मुलाखतीत चर्चा करताना त्याने सांगितले की, “आधी मी फिरकी गोलंदाजी करत होतो, त्यामुळे माझ्या बोटांना त्रास होत होता. त्यानंतर मी लेग स्पिन टाकायला सुरुवात केली. माझ्याकडे त्यावेळी कोणीच प्रशिक्षक नसल्याने मी टीव्ही आणि फोनमध्ये ऑस्ट्रेलियन शेन वॉर्नचे व्हिडिओ पाहण्यास सुरवात केली. ते ज्याप्रमाणे चेंडूला फिरवतात ते मला फार आवडले, त्यामुळे मी लेगस्पिन स्वतः शिकलो.”

राशीद खानला मानतो आदर्श

केन्से अफगाणिस्तानच्या राशीद खानला आपला आदर्श मानतो. ज्या पद्धतीने तो गुगली टाकतो ते पाहून फार केन्सेला फार बरे वाटते. जरी सर्वत्र सध्या त्याची चर्चा चालू असली, तरी त्याचे आयपीएलच्या लिलावाकडे जास्त लक्ष नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, “मी बिनधास्त आहे आणि लिलावचा इतका विचार करीत नाही. माझा नागालँड संघ मला पाठिंबा देत आहे आणि लिलाव देखील आम्ही एकत्रच पाहू.”

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सने ट्रायलसाठी बोलावले

विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडकडून खेळत असताना केन्सेने अरुणाचल प्रदेशच्या विरोधात सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मिझोराम विरोधात तीन गडी बाद करून त्याने चार सामन्यात सात गडी बाद केले. आयपीएल लिलावात त्याची आधारभूत किंमत २० लाख इतकी असून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना त्याच्यात रस असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी केन्सेला गेल्या महिन्यात चाचणीसाठी बोलवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक

“खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा”, भारतीय क्रिकेटरचे चोख प्रतिउत्तर

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी पाहण्याची चाहत्यांना संधी; ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---