---Advertisement---

खुर्रम मंजूरने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची घेतली शाळा, एकाच षटकात ठोकले ५ चौकार

---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा चमकदार कामगिरी करणाऱ्या खुर्रम मंजूरने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने स्वतःला सिद्ध केले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय टी २० चषकात खेळताना, खुर्रम मंजूरने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एका षटकात तब्बल ५ चौकार ठोकले आहेत. जेव्हा खुर्रम मंजूरने शाहीन शाह आफ्रिदीची गोलंदाजी फोडून काढली, तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

सिंधच्या डावाच्या १७ व्या षटकात ३५ वर्षीय खुर्रम मंजूरने शाहीन शाह आफ्रिदीला, त्याच्या अद्भुत खेळीने अडचणीत आणले. आपल्या वेगाने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणणारा शाहीन शाह आफ्रिदी खुर्रम मंजूरसमोर अक्षरशः हताश दिसला. शाहीन शाह आफ्रिदीने विविध प्रकारचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पण, खुर्रम मंजूरने त्याला मैदानाच्या चौफेर चौकार ठोकेल.

सिंध विरुद्ध खयबर पखतुनख्वा यांच्यात रंगलेल्या या सामन्यात खुर्रमने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या आणि स्पर्धेचे दुसरे अर्धशतक झळकावले. पाकिस्तानचा संघ टी -२० विश्वचषकाची तयारी करत असल्याने शाहीन शाह आफ्रिदीचा फॉर्म त्याच्या संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. अशी अपेक्षा आहे की विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ आपल्या संघात काही बदल करू शकतो.

शोएब मलिक टी -२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात परतू शकतो. दुसरीकडे, जर खुर्रम मंजूर त्याच्या फलंदाजीने प्रभावित करत राहिला, तर निवडकर्ते त्याच्या नावावर विचार करू शकतात. पाकिस्तानला २४ ऑक्टोबर रोजी टी -२० विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

https://twitter.com/TheRealPCB/status/1443605859242807300

पाकिस्तानचा कर्णधार याने म्हटले आहे की आमचा संघ या विश्वचषकासाठी तयार आहे. आम्ही हा सामना सहज जिंकू कारण आम्ही यूएईच्या वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम आहोत. ‘न्यूझीलंड संघाने आपला दौरा रद्द केल्याने पाकिस्तान क्रिकेट ढवळून निघाले होते. त्यामुळे विश्वचषकात दमदार कामगिरी करून जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तान संघाचा प्रयत्न राहील.

महत्त्वाच्या बातम्या – 

कॅच विन्स द मॅचचा विसर! निर्णायक क्षणी त्रिपाठीचे गचाळ क्षेत्ररक्षण, ‘असा’ सोडला महत्त्वपूर्ण षटकार

पूजा-झुलनच्या भेदकतेपुढे ऑस्ट्रेलियाच्या बत्त्या गुल, तिसऱ्या दिवसाखेर यजमानांच्या ४ बाद १४३ धावा

भारतीय फलंदाजाला बाद करत एलिसा पेरीने रचला इतिहास, ‘हा’ अष्टपैलू विक्रम करणारी पहिलीच ऑसी क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---