जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) २६ मार्च रोजी सुरू होत आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यावर्षी आयपीएल मुंबई व पुणे येथे खेळली जाईल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे खेळाडू मुंबई येथे एकत्रित होत आहेत. संघाचा प्रमुख अष्टपैलू असलेला वेस्ट इंडीजचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) नुकताच मुंबई येथे दाखल झाला. त्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स कडून खास ट्वीट करण्यात आले.
पोलार्डचे झाले आगमन
आयपीएल २०२२ साठी पोलार्ड बुधवारी (१६ मार्च) मुंबई येथे पोहोचला. त्याच्या आगमनाच्या व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून शेअर करण्यात आला. त्यामध्ये लिहिले आहे,
‘लॉर्ड म्हणजे अस्सल मुंबईकर.. बरोबर ना पलटण.. पॉली तात्या संघाशी जुळल्यानंतर उत्साही झाला आहे.’
https://twitter.com/mipaltan/status/1504086209378742276?t=N_blvLvWkD-CxlCL7S-_yA&s=19
कायरन पोलार्ड हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी क्रिकेटपटू आहे. २०१० पासून तो केवळ मुंबई संघासाठीच खेळतो. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत जिंकलेल्या पाचही आयपीएल विजेतेपदांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. रोहित शर्माच्या अनुपस्थित तो संघाचे नेतृत्व करतानाही दिसतो. आयपीएल २०२२ साठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांच्यासह त्याला मुंबई संघ व्यवस्थापनाने संघात कायम केले होते. संघाला आणखी एक विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. मुंबई इंडियन्स २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
आयपीएल २०२२ साठी मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन
महत्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार रोहित बनणार विराटपेक्षा यशस्वी कर्णधार, क्रिकेट दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video
वनडे क्रमवारीत भारतीय महिलांचे भारी नुकसान, अनुभवी मिताली, झूलनची घसरण; स्म्रीतीही टॉप-१०मधून बाहेर






