रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२चा हंगाम चांगला राहिलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले असून हे पाचही सामने गमावले आहेत. त्यातही पंजाब किंग्जविरुद्ध पुण्याच्या स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२मधील २३व्या सामन्यातील पराभव त्यांच्यासाठी अतिशय निराशादायी राहिला. पंजाब मुंबईच्या हातातोंडाशी आलेला घास खेचत मुंबईला १२ धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव हताश झाला होता, परंतु त्याचा संघ सहकारी कायरन पोलार्डने त्याला धीर दिला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, मुंबईच्या (Mumbai Indians) फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. परंतु त्यांचे विश्वासू फलंदाज तिलक वर्मा आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) धावबाद झाल्यामुळे सामना त्यांच्या हातून निसटला. महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही धावबाद होण्याच्या प्रसंगावेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानावर उपस्थित होता.
अर्शदीप सिंगच्या १३व्या षटकादरम्यान सूर्यकुमारने लेग साइडला फटका मारला होता, ज्याचा चेंडू सरळ मयंक अगरवालच्या हातात गेला होता. सूर्यकुमारला या चेंडूवर धाव घ्यायची नव्हती. परंतु नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला तिलक कोणताही इशारा न करता धाव घेण्यासाठी पळाला. परिणामी मयंक अगरवाल आणि अर्शदीप सिंगने मिळून तिलकला धावबाद केले. तो २० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ३ चौकारांसह ३६ धावा करून बाद झाला.
त्यानंतर धाकड अष्टपैलू कायरन पोलार्डही धावबाद झाला. ही घटना १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर घडली. पोलार्डने वैभव अरोराच्या चेंडूवर लाँग ऑनला फटका खेळला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला. धाव पूर्ण केल्यानंतर पोलार्डला दिसले की, ओडियन स्मिथकडून चेंडू निसटला होता. त्यामुळे पोलार्डने त्याचा फायदा घेण्याचे ठरवले आणि अधिकची १ धाव घेण्याच्या तोही नादात धावबाद झाला. केवळ १० चेंडूवर त्याने त्याची विकेट गमावली.
https://twitter.com/SlipDiving/status/1514303424535224321?s=20&t=AF34N6CTsY_XaDZJr2x3Tw
जेव्हा एखादा खेळाडू दुसऱ्या बाजूला उभा असताना इतर २ खेळाडू धावबाद होताना पाहतो, तेव्हा त्याचे हताश होणे साहजिक असते. सूर्यकुमारच्या बाबतीतही असेच घडले. त्याने तिलक आणि पोलार्डला धावबाद होताना पाहिल्यामुळे तो इतका उदास झाला की, थेट मैदानावर खाली बसला. यावेळी मागून पोलार्ड आला आणि सूर्यकुमारच्या खांद्यावर हात ठेवून त्याला (Kieron Pollard Encourages Suryakumar Yadav) प्रेरणा दिली.
त्यानंतर सूर्यकुमारने काही चांगले फटके खेळले. ३० चेंडू खेळताना ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने त्याने ४३ धावा फटकावल्या. परंतु तो संघाचा विजय टाळू शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू सीमापार करण्यात शिखर ‘नंबर वन’; विराट, गेल सारखे खेळाडू पडलेत मागे
रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात
‘आता तर सवयच झाली’, मुंबई इंडियन्सच्या सलग ५ व्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल