जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी एक आठवड्याचा वेळ शिल्लक राहिला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने या नव्या हंगामाची तयारी सुरू केली असून, सर्व युवा क्रिकेटपटूंचा कॅम्प मुंबई येथे आयोजित केला आहे. या पहिल्या कॅम्पमध्ये प्रथमच संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनलेला कायरन पोलार्ड खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसला.
वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू राहिलेला पोलार्ड मुंबई इंडियन्ससाठी 13 हंगाम खेळला. आयपीएल इतिहासातील दिग्गज खेळाडूंमध्ये त्याची नोंद होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो अजूनही विविध लीगमध्ये खेळताना दिसतो. मात्र, त्याचवेळी त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईसाठीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला.
संघाच्या पहिल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो युवा खेळाडूंना प्रशिक्षण देतानाची छायाचित्रे नुकतीच मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली.
गुरू Pollard ➕ शिष्य Arshad 🟰 a कडक combination! 🤩#OneFamily #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @KieronPollard55 pic.twitter.com/u2BMNm7oLQ
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2023
पोलार्ड हा 2010 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना दिसला होता. पहिल्याच हंगामात त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने मागील वर्षी आयपीएल हंगाम संपल्यानंतर आपल्या आयपीएल निवृत्तीची घोषणा केली होती. पोलार्डने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 189 सामने खेळताना 3412 धावा केल्या असून, त्याच्या नावे 69 बळी देखील जमा आहेत. मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या पाचही आयपीएल विजेतेपदात तो महत्त्वाचा शिलेदार होता.
मुंबई इंडियन्स संघाला मागील दोन आयपीएल हंगामात विशेष कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला नामुष्कीरित्या अखेरच्या स्थानी राहावे लागलेले. त्यामुळे यावेळी मुंबई आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
(Kieron Pollard First Look As Mumbai Indians Batting Coach For IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड
“आयपीएल सुरू झाल्यावर असे पराभव विसरले जातील”, दिग्गजाने कर्णधार व प्रशिक्षकांना सुनावले