---Advertisement---

इंग्लंडला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देणार कायरन पोलार्ड! कॅरेबियन दिग्गजाच्या खांद्यावर नवी जबाबदारी

On: रविवार, डिसेंबर 24, 2023 8:43 PM
kieron pollard
---Advertisement---

वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा चाहतावर्ग मोठा आहे. पोलार्ड नोव्हेंबर 2022मध्ये इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झाला आणि मुंबई इंडिन्सचा फलंदाजी प्रशिक्षक बनला. त्याआधी एप्रिल 2022मध्ये दिग्गजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलमध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडल्यानंतर आता पोलार्डला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रशिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी कायरन पोलार्ड (Kieron Pollard) इंग्लंड संघाचा सहायक प्रशिक्षक बनला आहे. रविवारी (24 डिसेंबर) त्याच्या नियुक्तीबाबत अधिकृत माहिती इंग्लंड क्रिकेटकडून मिळाली. पोलार्डने वेस्ट इंडीजसाठी 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2012 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीज संघाचा पोलार्ड भाग होता. तसेच 2021 हंगामात त्याने वेस्ट इंडीज संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेणारा हा दिग्गज जगातील इतर लीगमध्ये मात्र अजूनही खेळत आहे.

यावर्षीच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पोलार्ड ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा, तर अबू धाबी टी10 लीगमध्ये न्यू यॉर्क स्ट्रायकर्स संघाचा कर्धणार राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या आएलटी-20 मधेही पोलार्ड एमआय इमिरेट्स संघाचे नेतृत्व करतो. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून चांगले काम केले आहे. आजवरची आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमधील कारकीर्द पाहता इंग्लंड संघाने त्याला सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेला निर्णय योग्य वाटतो. आगामी टी-20 विश्वचषक हंगामात तो इंग्लंड संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडताना दिसू शकतो.

वेस्ट इंडीज आणि यूएसए यांच्याकडे आगामी टी-20 विश्वचषकाचे यजमानपद आहे. 7 कॅरेबियन आणि यूएसएमधील तीन स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडीजमधील स्टेडियमची पोलार्डला चांगली ओळख असल्यामुळे तो इग्लिश फलंदाज आणि सोबतच गोलंदाजांना मार्गदर्शन करू शकतो.

दरम्यान, 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेतही इंग्लंड संघाने अशीच रणनीती वापरून माईक हसी याला सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले होते. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेत हसीचे मार्गदर्शन इंग्लंडसाठी चांगलेच फायदेशीर ठरले आणि त्यांना विश्वचषक जिंकला देखील. असे असले तरी, आघामी हंगामात इंग्लंडसाठी चांगले प्रदर्शन करण्याचे आव्हान असेल. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात इंग्लंड संघाचे प्रदर्शन सुमार दिसले. लीग स्टेजच्या 9 पैकी 6 सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. (Kieron Pollard has become England’s assistant coach ahead of T20 World Cup 2024)

महत्वाच्या बातम्या – 
ग्लॅडिएटर्स, स्पार्टन्स, रॉयल्स, डायनामोज उपांत्यपूर्व फेरीत
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत साई एफसी, दुर्गा एफसी संघांची विजयी सलामी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---