विंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेऴाडू किरॉन पोलार्डच्या बाबतीत ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये एक खास योगायोग झाला आहे.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 528 चौकार आणि 528 षटकार आहेत. बऱ्याचदा खेळाडूंच्या षटकार आणि चौकारांच्या संख्येत मोठा फरक असतो. मात्र पोलार्डच्या बाबतीत चौकार आणि षटकारांची संख्या सारखीच असण्याचा खास योगायोग जुळुन आला आहे.
पोलार्डने हे चौकार आणि षटकार एकूण 423 ट्वेंटी20 सामन्यात मारले आहेत. त्याचबरोबर तो ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तर सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तब्बल 26 व्या क्रमांकावर आहे.
या दोन्ही यादीत विंडिजचाच आक्रमक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने 851 षटकार आणि 873 चौकार मारले आहेत.
तसेच पोलार्डने ट्वेंटी20 मध्ये आत्तापर्यंत 29.79 च्या सरासरीने 8193 धावा केल्या आहेत.
सध्या तो 8 आॅगस्टपासून सुरु झालेल्या कॅरेबियन प्रीमीयर लीगमध्ये खेळत असुन 12 आॅगस्टला तो कर्णधार असलेल्या सेंट लुसिया संघाचा सामना गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाविरुद्ध होणार आहे.
त्यामुळे या सामन्यानंतर त्याच्या षटकारांच्या आणि चौकारांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष?
–अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा? हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न
–जेव्हा अर्जुन तेंडुलकर बनतो विक्रेता