---Advertisement---

मुझसे शादी करोगी? हाँगकाँगच्या क्रिकेटरने भर स्टेडियममध्ये प्रेयसीला केले प्रपोज, उत्तर मिळालं…

On: गुरूवार, सप्टेंबर 1, 2022 8:49 AM
Kinchit-Shah-Proposal
---Advertisement---

आशिया चषक 2022 चा चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग संघात झाला. दुबईच्या मैदानावर झालेला हा भारतीय संघाने 40 धावांनी हा सामना जिंकला आणि सुपर-4 फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुसरीकडे पराभवानंतरही हाँगकाँग संघाच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. हाँगकाँगचा मधल्या फळीतील फलंदाज किचिंत शाह याने सामन्यानंतर भर स्टेडियममध्ये आपल्या प्रेयसीला लग्नासाठी मागणी घातली आहे. या गोड प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

भारतीय वंशाच्या किंचितने (Kinchit Shah) सामना संपल्यानंतर अचानक स्टेडियममधील दर्शकांच्या रांगेत प्रवेश केला आणि तिथे बसलेल्या आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलमध्ये (Kinchit Shah Proposal To Girlfriend) प्रपोज केले. किंचितच्या या अंदाजावर सामना दर्शक फिदा झाले आहेत. तसेच त्याची प्रेयसी त्याला लग्नासाठी हो म्हणाली की नाही?, हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.

किंचित शाहचा फिल्मी स्टाईल प्रपोजल
26 वर्षीय किंचित सामना संपल्यानंतर हाँगकाँग संघाच्या जर्सीतच दर्शकांमध्ये जातो. त्याला असे दर्शकांच्या रांगेत येताना पाहून तिथे बसलेले लोक चकित होतात. मग तो चालत दर्शकांमध्ये बसलेल्या एका मुलीकडे जातो आणि तिच्यापुढे गुडघे टेकून बसतो. मग तो हातात अंगठी घेतो आणि अगदी बॉलीवूड सिनेमांप्रमाणे तिला लग्नासाठी मागणी (kinchit Shah Proposing Girlfriend) घालतो.

पूर्ण पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली ती मुलगी अजून कोण नसून किंचितची प्रेयसी होती. किंचितने तिला केलेल्या या प्रपोजलला पाहून तिला आनंद अनावर होतो आणि ती त्वरित किंचितला होकार दर्शवते. तिच्या होकारानंतर किंचित अंगठी तिच्या बोटात घालतो. हा संपूर्ण प्रसंग कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.

किंचितने आपल्या प्रेयसीला अशाप्रकारे प्रपोज करत फक्त तिचेच नव्हे तर स्टेडियममध्ये उपस्थित दर्शकांचेही मन जिंकले आहे. हा संपूर्ण प्रसंग कॅमेराद्वारे स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर दाखवला गेला. अगदी समालोचक गौतम गंभीर, संजय बांगड आणि शो होस्ट जतिन सप्रू यांनीही हे प्रपोजल पाहिले. हाँगकाँग संघाच्या खेळाडूंनीही किंचितला होकार मिळाल्यानंतर टाळ्या वाजवल्या.

मुंबईत झालाय किंचित शाहचा जन्म
दरम्यान किंचित जरी हाँगकाँग संघाकडून क्रिकेट खेळत असला, तरीही तो मूळ भारतीय आहे. त्याचा जन्म मुंबईतला आहे. किंचित 3 महिन्यांचा असताना त्याचे वडिल संपूर्ण कुटुंबाला घेऊन हाँगकाँगला स्थायिक झाले. त्याचे वडिलही क्रिकेट खेळत होते. आपल्या वडिलांना क्रिकेट खेळताना पाहून किंचितनेही बॅट हाती पकडली आणि लहानपणीपासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने 30 धावा केल्या.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

माईलस्टोन! जड्डू बनला आशिया कपमध्ये एक नंबर! दिग्गज भारतीयालाच सोडले मागे
अखेर विराटचीच आघाडी! माजी कर्णधार कोहलीने मोडला कर्णधार रोहितचा विक्रम
ना सचिन, ना जयसुर्या, ना धोनी! असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---