आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाला मिळाले आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतातील 10 शहरांमध्ये होणार आहे. भारतीय संघ 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये साखळी फेरीचे 9 सामने खेळेल. मात्र, खास बाब अशी आहे की, विराट कोहली याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या निश्चित केलेल्या 10 पैकी 9 मैदानांवर कमीत कमी 1 शतक झळकावलं आहे. फक्त एकच मैदान असे आहे, ज्यावर विराटच्या बॅटमधून शतक येणे अजूनही बाकी आहे. मात्र, त्या मैदानावर विराट आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये.
खरं तर, बीसीसीआय आणि आयसीसीने मिळून 10 मैदानांवर वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, हैदराबाद, धरमशाला, बंगळुरू आणि अहमदाबाद यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) याने या 10 पैकी 9 मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमीत कमी 1 शतक ठोकले आहे. विराटने कोलकाता आणि पुण्याच्या मैदानांवर सर्वाधिक प्रत्येकी 3 शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीने लखनऊमध्ये एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं नाहीये. विशेष म्हणजे, विराटने अद्याप लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. विराटने कोलकाता आणि पुण्यात 3-3 शतके, तर दिल्ली, चेन्नई आणि मुंबईमध्ये 2-2 शतके झळकावली आहेत. तसेच, अहमदाबाद, धरमशाला, बंगळुरू आणि हैदराबाद येथे प्रत्येकी 1 शतक केले आहे. हैदराबादमध्ये भारतीय संघ एकही सामना खेळणार नाहीये.
आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 27 जून) जाहीर केले. वेळापत्रकानुसार, स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. स्पर्धेतील भारतीय संघाचे सर्व सामने दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत. (king virat kohli has scored century in all world cup 2023 venues except lucknow know here)
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या महिलांचा नादच खुळा! न्यूझीलंडच्या नांग्या ठेचत रचला इतिहास, कर्णधार अटापट्टूचे विक्रमी शतक
श्वास रोखून धरा! लॉर्ड्समध्ये लायन रचणार 2 मोठे विक्रम, एक रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच नाही जमला