मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू मनदीप सिंगने डिसेंबर 2016 मध्ये जगदीप जयस्वालशी लग्न केले होते. मनदीपच्या लग्नात एमएस धोनीने अचानक पोहोचून सर्वांना चकित केले. वस्तुतः धोनीने मनदीपला सांगितले होते की, लग्नाच्या दिवशी तो न्यूयॉर्कमध्येच राहणार आहे, परंतु बराच मोठ्या प्रवासानंतर धोनी मनदीपच्या रिसेप्शनला पोहोचला.
मनदीपची पत्नी एक मेकअप आर्टिस्ट आहे. तिने यातच करिअर घडविण्याचे ठरविले होते. लहान वयातच ती मेकअपकडे झुकू लागली. विशेषत: आयलाइनरसाठी. जगदीप शाळेत असताना मुलींचा मेकअप करायची.
https://www.instagram.com/p/B8jXtTyhphU/
2015 मध्ये जगदीप अधिकृतपणे मेकअप आर्टिस्ट झाली. तिने एशियन ब्राइडल कोर्स केला आहे. सुरवातीला जगदीपने ते छंदाप्रमाणे घेतले. नंतर तिला समजले की तिलाही यातच करियर करायचे आहे.
एका मुलाखतीत जगदीपने सांगितले की, ‘ती स्वत: ला एका स्टार खेळाडूची पत्नी म्हणून पाहत नाही. पण विशेषत: आयपीएल दरम्यान स्टार खेळाडूची पत्नी होणे चांगले आहे.’
क्रिकेटविषयी ती म्हणते की,’आयपीएलचे सामने पाहून खूप आनंद घेते. पण खूप मी मोठी फॅन नाही.’
https://www.instagram.com/p/B6enA5-h1Yl/
पंजाबचा खेळाडू मनदीप सिंग हा आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाब या संघाकडून खेळतो. आयपीएलच्या सामन्यात मनदीपची पत्नी जगदीप ही तिच्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास स्पर्धा होणार रद्द? जाणून घ्या काय आहे नियम
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर
अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…