गुरुवारी (२४ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा ६वा सामना पार पडला. दुबईच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने तब्बल ९७ धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ३ विकेट्स गमावत २०६ धावांचा भलामोठा स्कोर उभा केला. बेंगलोर संघाला पंजाबच्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १७ षटकात केवळ १०९ धावाच करता आल्या.
तसं तर पंजाब संघाकडून खेळताना सर्व खेळाडूंनी त्यांचे योगदान दिले. पण संघातील ५ खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला. आम्ही त्याच ५ खेळाडूंचा आढावा घेतला आहे. Kings XI Punjab’s 5 Players Who Played Well Against RCB
केएल राहुल
पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत ६९ चेंडूत नाबाद राहत १३२ धावा केल्या. यात त्याच्या १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. राहुलच्या या तूफानी फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रवि बिश्नोई
पंजाबचा २० वर्षीय फिरकीपटू रवि बिश्नोई याने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने ४ षटकात गोलंदाजी करताना ३२ धावा देत तब्बल ३ विकेट्स चटकावल्या. यात बेंगलोरच्या ऍरॉन फिंच, वॉशिंग्टन सुंदर आणि उमेश यादव यांच्या विकेट्सचा समावेश होता. एवढेच नव्हे तर, बिश्नोईने देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहली यांचा झेल पकडत त्यांना पव्हेलियनला पाठवले.
मुरगन अश्विन
पंजाब संघाचा फिरकी गोलंदाज मुरगन अश्विन याचा बेंगलोरविरुद्धचा सामना हा आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना होता. अश्विनने या सामन्यात खूप महत्त्वपूर्ण गोलंदाजी केली. त्याने ३ षटके टाकत फक्त २१ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. यात एबी डिविलियर्स, नवदिप सैनी आणि युझवेंद्र चहल यांच्या विकेट्सचा समावेश होता.
शेल्डन कॉट्रेल
पहिल्याच सामन्यापासून पंजाब संघासाठी शानदार गोलंदाजी करणारा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. कॉट्रेलने सर्वप्रथम बेंगलोरचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डीकलला आपला शिकार बनवले. तर त्याने आपल्या दूसऱ्या षटकात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. दरम्यान त्याने ३ षटके टाकत केवळ १७ धावा दिल्या.
मयंक अगरवाल
आयपीएल २०२०मधील पंजाबच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या मयंक अगरवालने या सामन्यातही चांगली फलंदाजी केली. जरी त्याला मोठी आकडी धावसंख्या करता आली नसली, तरी त्याने २० चेंडूत ४ चौकार ठोकत २६ धावा ठोकल्या.
ट्रेंडिंग लेख –
शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम
आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक
सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानकडून ४०० विकेट्स घेणारा गोलंदाज होणार निवृत्त, आता ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब
चेन्नई-दिल्ली आज येणार आमने-सामने, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आरसीबीविरुद्ध केएल राहुलने केली तुफान फटकेबाजी, मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम