fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक

5 most expensive spin bowlers ipl

September 25, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राची १९ सप्टेंबर रोजी शानदार सुरुवात झाली. आयपीएलचा हा हंगाम युएईमध्ये खेळाला जात आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या आणि श्रीमंत असलेल्या या टी २० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात अनेक महागड्या खेळाडूंचा समावेश आहे.
युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या या हंगामात खेळणाऱ्या अनेक खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरू सुरू झाला असला तरी या लेखात तुम्हाला सर्वाधिक किंमत मिळालेल्या ५ फिरकी गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत. या पाच सर्वात महाग फिरकी गोलंदाजांवर सर्वांचे विशेष लक्ष असेल.

या हंगामात सर्वात जास्त रक्कम मिळवणारे ५ फिरकी गोलंदाज

सुनील नरेन – १२.५ कोटी

आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा सुनील नरेन अनेक वर्षांपासून दिग्गज फिरकी गोलंदाज म्हणून खेळत आहे. सुनील नरेन आयपीएलमध्ये प्रथम कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा सदस्य झाला आणि त्यानंतर त्याने कधीही हा संघ बदललेला नाही. नरेनने २०१२ मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले. तेव्हापासून तो केकेआरकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.

केकेआरने त्याला २०१८ च्या हंगामाच्या आधी तब्बल १२.५ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रत्येक हंगामात त्याला १२.५ कोटी रुपये मिळत आहेत. नरेन केवळ फिरकी गोलंदाजीने आपली छाप सोडत नाहीत तर फलंदाजीद्वारेही उत्तम कामगिरी करतो. सुनील नरेन आयपीएलच्या सर्वात महागड्या फिरकी गोलंदाजांमध्ये आहे.

राशिद खान – 9 कोटी

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान याचे गेल्या काही वर्षांत क्रिकेट जगातील सर्वात मोठा खेळाडू म्हणून नाव पुढे आले आहे. रशीद खानने आपल्या गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच गेले तीन वर्षे आयपीएलमध्ये तो खेळत आहे. आयपीएलमधील अफगाण खेळाडू म्हणून रशीद खान पहिला खेळाडू ठरला.

स्टार गोलंदाज राशिद खानला सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१८ च्या लिलावात ९ कोटींच्या किंमतीत कायम केले होते. त्याआधीही सन २०१७ मध्ये तो सनरायझर्स संघात खेळला होता. आयपीएलमध्ये राशिद खानची अतिशय प्रभावी कामगिरी आहे. त्याने केवळ ३ हंगामात स्वत: ला उत्तम खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे.

केदार जाधव – ७.८ कोटी

भारतीय क्रिकेटमधील छोटा फटाका म्हणून ओळखला जाणारा केदार जाधव हा खूप उपयुक्त खेळाडू मानला जातो. केदार जाधव आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळत आहे. केदार जाधव याला या स्पर्धेमध्ये २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले होते. केदार यापूर्वी काही संघांकडून खेळला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने केदार जाधववर मोठी रक्कम लावून त्याला ७.८ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. केदार जाधव फलंदाजी तसेच उपयुक्त फिरकी गोलंदाजीही करण्यात माहीर आहे. त्याने फिरकी गोलंदाज म्हणून भारतासाठी चांगली गोलंदाजी केली आहे.

आर अश्विन – ७.६ कोटी

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा हुकमी फिरकी गोलंदाज आर अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आयपीएलमध्येही दर्जा आहे. आर अश्विन अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. यावेळी अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या संघात जागा दिली आहे. परंतु, आर अश्विन मागील दोन सत्रात आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनबरोबर ७.६ कोटी रुपयांचा करार केला होता. कर्णधार म्हणून तो पंजाबकडून दोन वर्षे खेळला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ७.६ कोटींच्याच रक्कमेत त्याला विकत घेतले. आता अश्विन पहिल्यांदाच दिल्लीच्या संघाकडून खेळात आहे. दिल्ली कॅपिटल संघाकडून यंदा पहिल्याच सामन्यात त्याने आपला दर्जेदार खेळ दाखवायला सुरुवात केली, परंतु तो दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले.

रवींद्र जडेजा – ७ कोटी

चेन्नई सुपर किंग्ज संघात रवींद्र जडेजा सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये मोठे यश मिळवले आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे. तो अनेक वर्षांपासून या संघाशी संबंधित आहे. तो सतत त्यांची प्रतिभा दाखवत असतो.
जडेजाचा चेन्नई संघाबरोबर ७ कोटींचा करार आहे.

फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीतही तो मोलाचे योगदान देतो. आयपीएलमध्ये खेळणार्‍या फिरकी गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा एक महागडा फिरकीपटू आहे. या हंगामात त्याने आतापर्यंतच्या २ सामन्यात २ गाडी बाद केले आहेत.


Previous Post

सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे

Next Post

मराठीत माहिती- क्रिकेटर बिशन सिंग बेदी

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

भारत-इंग्लंड मालिकेला नाव दिलेले ‘ऍन्थनी डी मेलो’ आहेत तरी कोण?

January 26, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला….

January 26, 2021
Next Post

मराठीत माहिती- क्रिकेटर बिशन सिंग बेदी

Photo Courtesy: Twitter/ ICC

डीन जोन्स यांचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज खेळाडूने दिला होता सीपीआर

Photo Courtesy: www.iplt20.com

शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.