पुणे येथे सुरू असलेल्या वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत गुरुवारी (२६ मे) वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर असा सामना खेळला गेला. ट्रेलब्लेझर संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाच्या बॅटर्सने शानदार कामगिरी करत १९० धावा धावफलकावर लावल्या. त्यानंतर गोलंदाजांनी वेलोसिटी संघाला रोखण्यात यश मिळवणे. मात्र, तरीही सरस रनरेटने वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या सामन्यात किरण नवगिरे या युवा खेळाडूने सर्वांची मने जिंकली. आपला पहिलाच टी२० चॅलेंज सामना खेळणाऱ्या किरणने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.
किरणची वादळी फलंदाजी
ट्रेलब्लेझर संघाने वेलोसिटी संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी १५८ धावा करणे गरजेचे होते. वेलोसिटीला यस्तिक भाटिया व शेफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात दिली. मात्र, खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पहिलाच सामना खेळणाऱ्या किरण नवगिरेने. सोलापूरच्या असलेल्या किरणने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. तिने तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. यादरम्यान अवघ्या २५ चेंडूंमध्ये तिने अर्धशतक साजरे केले. हे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी हा पराक्रम शेफाली वर्माच्या नावावर होता. तिने याचवर्ष सुपरनोवा विरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर, जेमिमा रोड्रिग्जने २०१९ मध्ये ३१ चेंडूत ही कामगिरी केलेली.
किरणची झुंज अपयशी
वेलोसिटी संघाला या सामन्यात १५८ धावा करतात अंतिम फेरीत मजल मारण्याची संधी होती. त्यांनी ती संधी साधली. मात्र, संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. किरणने ३४ चेंडूवर ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. किरण बाद झाल्यानंतर कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही व संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
महत्वाच्या बातम्या-
Womens T20 Challenge। मंधानाच्या संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही वेलोसिटीला मिळालं फायनलचं तिकीट
जेमिमा-मेघनाचा वुमेन्स टी२० चॅलेंजमध्ये नवा कारनामा; तीन वर्षानंतर घडली ती घटना