---Advertisement---

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन स्पर्धा: आर्यन किर्तने, गौरी यालेचा उपांत्य फेरीत प्रवेश

On: गुरूवार, एप्रिल 21, 2022 5:54 PM
Aryan-Kirrtane
---Advertisement---

पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित, एमक्युअर फार्मासिटिकल पुरस्कृत व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन किर्तने याने तर, मुलींच्या गटात गौरी याले या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित आर्यन किर्तने याने आठव्या मानांकित आरव बेलेचा 6-2, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरी धडक मारली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने आपली विजयी मालिका कायम ठेवत कियान पटेलचे आव्हान 6-0, 6-0 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित वरद उंडरे याने सर्वज्ञ सरोदेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3) असा पराभव केला.

मुलींच्या गटात आठव्या मानांकित गौरी याले हिने अव्वल मानांकित स्वरा जावळेवर 6-4, 6-4 असा सनसनाटी विजय मिळवला. अतितटीच्या लढतीत चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरने पाचव्या मानांकित काव्या पांडेचा टायब्रेकमध्ये 6-7(10), 6-3, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. शिबानी गुप्तेने सारा फेंगसेचा 6-1, 6-0 असा तर, श्रावी देवरे हिने तुहिना रॉयचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.कियान पटेल 6-0, 6-0;
आरव पटेल[4] वि.वि.वीरेन चौधरी(5) 6-3, 6-3;
आर्यन किर्तने वि.वि.आरव बेले[8]6-2, 6-0;
वरद उंडरे [2] वि.वि.सर्वज्ञ सरोदे 6-3, 7-6(3);

मुली:
गौरी याले[8] वि.वि.स्वरा जावळे[1] 6-4, 6-4;
रित्सा कोंडकर [4] वि.वि.काव्या पांडे[5]6-7(10), 6-3, 6-0;
शिबानी गुप्ते वि.वि.सारा फेंगसे 6-1, 6-0;
श्रावी देवरे वि.वि.तुहिना रॉय 6-0, 6-0;

महत्त्वाच्या बातम्या – 

सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धा: महाराष्ट्राच्या आदिती रॉयचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए १६ वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज २०२२ स्पर्धेत अवनीश चाफळेचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद: आर्यन किर्तने, शिबानी गुप्ते यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---