इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा १५वा हंगाम नुकताच पूर्ण झाला आहे. या हंगामात अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखवली. मात्र, आयपीएल सुरू होण्यापूर्वीच एका खेळाडूने आपले नाव गाजवायला सुरू केले होते. तो खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक आणि तुफानी सलामीवीर ईशान किशन. ईशानवर यंदाच्या आयपीएल लीलावात सर्वात जास्त बोली लावत मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मात्र, यावर्षी सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या ईशानच्या कारकिर्दीत मोलाचा वाटा त्याचा भाऊ राज किशन याचा देखील आहे.
गोष्ट १५ वर्षांपूर्वीची आहे. स्कूल गेम फेडरेशनच्या वतीने बिहारचा संघ मुंबईत खेळण्यासाठी दाखल झाला. राज किशन (Raj Kishan) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे दोन भाऊ बिहारच्या या संघात निवडले गेले होते. राज किशनला त्याच्या कामगिरीमुळे सलामीवीर म्हणून संधी मिळाली, तर लहान भाऊ ईशान किशनला संधी मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत ईशान किशन खूप निराश झाला. भावाला हताश होताना पाहून राजने क्रिकेटमधून बलिदान दिले. आणि स्वतःची पाठीमागे सारत, लहान भावाला पुढे येण्याची संधी दिली.
राज किशनला माहित होते की ईशानमध्ये देखील क्रिकेटसाठीची समर्पण भावना आणि क्षमता आहे. या कारणास्तव त्यांनी धाकट्या भावाला पुढे आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजने स्वतःला अभ्यासात झोकून दिले आणि क्रिकेटमध्ये आपल्या धाकट्या भावाला पूर्ण साथ दिली. चांगला फलंदाज असूनही भावाच्या प्रेमामुळे आणि मैत्रीमुळे राजने क्रिकेट सोडले. याच बलिदानामुळे आज ईशान किशन क्रिकेटपटू म्हणून नाव कमवत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघाने १५.२५ कोटी रुपये खर्च करत ईशानला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आयपीएल २०२२मध्ये ईशानने खेळलेल्या १४ सामन्यांत त्याने ३२.१५च्या सरासरी आणि १२०.११च्या स्ट्राईक रेटने ४१८ धावा केल्या. मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा पलंदाज ठरला. मात्र, या हंगामात मुंबईला कोणतीही विशे, कामगिरी करता आली नाही. संघ पॉईंट्स टेवल मध्ये शेवटच्या स्थानी राहिला. त्यामुळे पुढच्या हंगामात संघ ईशानकडून आणखी चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा करत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर
‘हिटमॅन’चा मोठा विक्रम तोडण्यास ‘कॅप्टन’ केएल राहुल सज्ज; दिल्ली टी२०त करणार पराक्रम