---Advertisement---

बापरे बाप! सामना चालू असतानाच घारींचा हल्ला, पंड्याला फुटला घाम, तर स्टॉयनिसही घाबरला, Video

Kites-Attack-On-Ind-vs-Aus-3rd-ODI
---Advertisement---

बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 49 षटकात 10 विकेट्स गमावत 269 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारताने 200 धावांचा टप्पा पार केल्यानंतर सामना काही वेळासाठी अचानक थांबवला गेला. काय होतं यामागील कारण, चला जाणून घेऊयात…

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मैदानात घारींचा हल्ला
झाले असे की, भारतीय संघाने 41व्या षटकानंतर 6 विकेट्स गमावत 209 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून 42वे षटक टाकण्यासाठी मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आला होता. तसेच, स्ट्राईकवर हार्दिक पंड्या होता. तसेच, दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) उभा होता. यावेळी षटकातील 4 चेंडूही खेळून झाले होते. मात्र, चार चेंडूंनंतर अचानक सामना थांबवण्यात आला. यावेळी अचानक घारींनी मैदानावर एन्ट्री केली. यामुळे पंड्याही चिंतेत पडला आणि स्टॉयनिसही पुरता घाबरलेला. त्यामुळे सामना थांबवला गेला.

खरं तर, घार मैदानात पडलेल्या एका किड्याला उचलण्यासाठी आली होती. त्यामुळे हा सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला. मात्र, काही वेळानंतर सामना पुन्हा सुरू झाला. अशात सामन्यादरम्यानचे घारींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

 

भारताचा दारुण पराभव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंची झुंज अपयशी पडली. भारताला यावेळी 49.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 248 धावाच करता आल्या. विराट कोहली (Virat Kohli) याने यावेळी भारताकडून सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकाही 2-1ने नावावर केली. (kites attack on india vs australia 3rd odi match in chennai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझा स्टँडर्ड आभाळाएवढा…’, सिराजने कॅच सोडताच संतापला जडेजा, पण गावसकरांच्या प्रतिक्रियेने जिंकले मन
‘हिटमॅन’चा भीमपराक्रम! बनला आशियामध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा 8वा भारतीय, जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---