जगातील फॅब-४ म्हणून एकावेळी सचिन, लारा, पॉन्टिंग आणि जयसूर्या यांना ओळखले जायचे. हे खेळाडू त्यांच्या जबदस्त कामगिरीमुळे ओळखले जात असत.
गेल्या २-३ वर्षांपासून अशीच एक फॅब-४ ची नवी चौकड जन्माला आली. मैदानातील त्यांच्या कामगिरीबरोबरच वैयक्तिक जीवनातही यांच्याबद्दल जोरदार चर्चा होते. या फॅब-४ पैकी विराट, जो रूट आणि स्मिथ यांनी कधीही आपली वैयक्तिक लाइफ अर्थात खाजगी आयुष्य लपवून ठेवले नाही. परंतु फॅब-४ पैकी केन विलियम्स मात्र आपले सार्वजनिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांची गफलत होऊ देत नाही.
परंतु काही मीडिया रिपोर्टप्रमाणे न्यूझीलँडचा हा प्रतिभावान कर्णधार एका नर्सच्या प्रेमात आहे. केनच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे सारा रहीम आहे. नर्स प्रोफेशन असलेली सारा ही मूळची ब्रिटिश आहे. या जोडीला हॉलिडेवर असताना अनेक वेगवेगळ्या बीचवर पाहण्यात आले आहे. २०१६ सालानंतर ही जोडी खऱ्या अर्थाने चर्चेत आली जेव्हा केन आणि सारा ऑकलँडमध्ये झालेल्या अवॉर्ड समारंभात एकत्र दिसले.
याबरोबर फॅब-४ मधील चारही प्रतिभावान खेळाडूंना गर्लफ्रेंड असल्याचं सर्वांना माहित झालं. जो रूट मे २०१६ मध्ये कॅर्रीय कोट्टेरेल बरोबर एंगेजेड झाला असून गेल्याच महिन्यात स्टिव्ह स्मिथ डॅनी विलिसबरोबर एंगेजेड झाला. विराट कोहली हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा बरोबर डेटिंग करतो हे आता क्रिकेटप्रेमींसाठी नवीन गोष्ट राहिलेली नाही.