---Advertisement---

IPL 2025 साठी KKRचा मोठा निर्णय! माजी अष्टपैलू खेळाडूला प्रशिक्षकपदाची जबाबदारी

On: शनिवार, मार्च 8, 2025 10:06 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. दरम्यान शुभारंभ सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. याआधी केकेआरने एक मोठी घोषणा केली आहे. केकेआरने नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या नवीन सहाय्यक प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. अभिषेक नायर आणि रायन टेन डोइशकोटे यांच्या जाण्यानंतर हे पद रिक्त होते आणि आता ते भरण्यात आले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 साठी वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू ओटिस गिब्सन यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. केकेआरने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि ओटिस गिब्सन यांच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीची माहिती दिली. तो म्हणाला, आमचे सहाय्यक प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांचे आम्ही स्वागत करतो. ओटिस आमच्या मजबूत सपोर्ट स्टाफ युनिटमध्ये सामील झाला. ज्यामध्ये मार्गदर्शक ड्वेन ब्राव्हो, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक कार्ल क्रो आणि इतरांचा समावेश आहे.”

केकेआरने आयपीएल 2024चे विजेतेपद जिंकले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपदावर आपले नाव कोरले होते. तथापि, यावेळी केकेआरचा संपूर्ण संघ आणि प्रशिक्षक कर्मचारी बदललेले आहेत. यावेळी श्रेयस अय्यरच्या जागी अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तर गौतम गंभीर, अभिषेक नायर आणि रायन टेन डोइशकोटे हे देखील संघाचा भाग नाहीत. यावेळी ड्वेन ब्राव्हो संघाचा मार्गदर्शक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ: फायनलमध्ये कोण मारणार बाजी? माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी
IND vs NZ: फायनलनंतर रोहित-विराट होणार निवृत्त? उपकर्णधाराचा मोठा खुलासा
IND vs NZ Final: “नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार..” विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---