---Advertisement---

IPL 2026 पूर्वी KKR च्या फलंदाजांनी रचला इतिहास; टी-20 विश्वचषकात मोडला सर्वात मोठा विक्रम

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 7:14 PM
---Advertisement---

2026 च्या टी20 विश्वचषकात (ICC T20 international world cup 2026) न्यूझीलंडचा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर, आता त्यांनी यूएई (UAE) विरुद्धही दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर टिम सीफर्ट आणि फिन ॲलन यांनी यूएईच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत भारतीय संघाचा एक मोठा विक्रम मोडला आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएल 2026 मध्ये KKR कडून खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान 100 धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर होता. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने 8.4 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, यूएई विरुद्ध 174 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सीफर्ट आणि ॲलन जोडीने केवळ 8.3 षटकांत 100 धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताचा विक्रम मोडीत काढला.

न्यूझीलंडने यूएईवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. टिम सीफर्टने नाबाद 89 आणि फिन ॲलनने नाबाद 84 धावांची खेळी केली. या जोडीने 175 धावांची अभेद्य भागीदारी केली, जी टी20 विश्वचषक इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या 15.2 षटकांत पूर्ण केले.

आयपीएल 2026 च्या लिलावात कोलकता नाईट रायडर्सने (KKR) या दोन्ही स्फोटक फलंदाजांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. सध्याचा त्यांचा फॉर्म पाहता, आगामी आयपीएलमध्येही ते अशीच कामगिरी करतील अशी संघाला अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---